Success Story : शेतकऱ्याची (Farmer) पोर कायमच चर्चेत असतात. आपल्या अनोख्या कामगिरीमुळे शेतकऱ्यांची मुलं देश-दुनियात आपल्या नावाचा ठसा उमटवतात. महाराष्ट्रातील पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली जिल्ह्यातील (Sangli) दोन नवयुवक शेतकरी पुत्रांनी देखील काहीशी अशीच कामगिरी केली आहे. दोन तरुणांनी सोशल मीडियाचा प्रभावी वापर करत यूट्यूब (Youtube Success Story) मधून शेती मध्ये (Farming) क्रांती घडविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.
विशेष म्हणजे युट्युब वर शेती संबंधित व्हिडिओ (Agricultural Video) तयार करून शेतकऱ्यांना जागृत तर करतच आहेत शिवाय महिन्याकाठी लाखो रुपयांची (Farmer Income) उलाढाल देखील युट्यूब मधून ते करत आहेत. सांगली मधील संतोष आणि आकाश या दोन तरुणांनी युट्युबवर इंडियन फार्मर नावाचे चैनल (Indian Farmer YouTube Channel) तयार करून देशातील शेतकऱ्यांना शेती संबंधित नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती देण्याचा अभिनव उपक्रम सुरू केला आहे.
आपल्या चैनल मधून शेतकऱ्यांची यशोगाथा तसेच यशस्वी शेतकऱ्यांनी वापरलेली शेती मधली अनोखी पद्धत इतर शेतकऱ्यांपर्यंत पोहचवत आहेत. त्यांनी तयार केलेल्या व्हिडिओमुळे त्यांना यूट्यूब च्या माध्यमातून महिन्याकाठी दोन लाखांची कमाई देखील होत आहे. हे दोन नवयुवक आपल्या यूट्यूब चैनल वर जुगाडू आणि कमी खर्चात तयार होणाऱ्या शेती यंत्रांची देखील शेतकऱ्यांना माहिती देतात. यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे. महाराष्ट्रातील सांगली येथे राहणारे संतोष आणि आकाश शेतीचे जुने चित्र बदलण्यासाठी एकत्र काम करत आहेत.
जिथे आजची तरुणाई डॉक्टर, इंजिनिअर किंवा आयएएस अधिकारी होण्याचे स्वप्न पाहत आहे. दुसरीकडे सांगलीतील इंडियन फार्मर युट्युब चॅनेल चालवणाऱ्या संतोष आणि आकाश नोकरी आणि कौटुंबिक व्यवसाय सोडून शेतीची निवड केली आहे. हा चैनल सुरू करण्यापूर्वी 28 वर्षीय संतोष जाधव गोल्ड रिफायनरीच्या कौटुंबिक व्यवसायात गुंतला होता. त्याचवेळी त्याचा मित्र आकाशलाही अभियांत्रिकी पदवी घेऊन फिल्म मेकिंग किंवा यूट्यूबमध्ये करिअर करायचे होते.
अशा परिस्थितीत या दोन्ही मित्रांनी मिळून 2018 साली इंडियन फार्मर नावाचे यूट्यूब चॅनल सुरू केले आणि या यूट्यूब चॅनेलद्वारे या दोन मित्रांनी लाखों शेतकरी जोडले आहेत. एकीकडे संतोष जाधव नवनवीन तंत्राने शेती करून शेतीच्या कामांची आणि नवीन तंत्रांची माहिती देतो, तर आकाश संतोषला व्हिडीओ रेकॉर्डिंग ब्लॉगिंग मध्ये पूर्ण तांत्रिक सहकार्य देऊन मदत करतो. आज इंडियन फार्मर केवळ ब्लॉगिंग करत नाहीत तर गावातील अनेक शेतकरी आणि तरुणांना रोजगारही देत आहेत. हे दोन नवयुवक शेतीतून कमाई करत आहेत शिवाय युट्युब व्हिडिओच्या माध्यमातून देखील कमाई करत आहे.
आजच्या घडीला इंडियन फार्मर या यूट्यूब चैनल ला तीन लाख शेतकऱ्यांनी सबस्क्राईब केले असून यातून त्यांना महिन्याकाठी दोन लाखांची कमाई होत आहे. निश्चितच या दोन युवकांनी युट्युब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा यशस्वी आणि अतिशय प्रभावी वापर करत भारतीय शेतीत क्रांती घडवण्यासाठी एक नवीन युगाची सुरुवात केली आहे.
निश्चितचं इंडियन फार्मर सारखे असे शेकडो यूट्यूब चैनल शेतकऱ्यांच्या हितासाठी सुरू होतील आणि सुरू करणारे तसेच त्याचा उपयोग करणारे दोघांना मोठा फायदा होईल. एकंदरीत शेतकरी हितासाठी सुरू झालेला हा यूट्यूब चैनल आजच्या घडीला या नवयुवकांसाठी लाख रुपये उत्पन्न कमवण्याचे साधन बनले आहे.
शिवाय त्यांच्या मार्फत इतर गावकऱ्यांना देखील रोजगार मिळाला आहे. एवढेच नाही तर त्यांचे व्हिडिओ बघून लाखो शेतकरी प्रभावित होत असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करून आपले उत्पन्न वाढवत आहेत. निश्चितच एका यूट्यूब चैनलनें भारतीय शेतीत बदल घडविण्यास सुरुवात केली आहे असं म्हणलं तर काही वावगे ठरणार नाही.