Success Story : भारतात गेल्या अनेक दशकांपासून शेती (Farming) समवेतच शेती पूरक व्यवसाय (Agricultural Business) मोठ्या प्रमाणात केले जात आहेत. यामध्ये मत्स्य पालन व्यवसायाचा (Fish Farming Business) देखील समावेश आहे. मित्रांनो मत्स्य पालन (Fish Farming) व्यवसाय शेतकऱ्यांसाठी नाहीतर भूमिहीन शेतमजुरांसाठी देखील फायद्याचा सौदा सिद्ध होत आहे.
उत्तर प्रदेशमधील एका रोजंदारीने काम करणाऱ्या अवलिया तरुणानें देखील मत्स्य पालन व्यवसाय सुरू करून करोडो रुपयांची कमाई (Farmer Income) करण्याची किमया साधली आहे. यामुळे सध्या हा अवलिया सर्वत्र चर्चेचा विषय बनला आहे. मित्रांनो उत्तर प्रदेश मधील (Uttar Pradesh) अम्रोहा येथील हरवेंद्रसिंग या नवयुवक तरुणाने मत्स्य पालन व्यवसाय करून करोडो रुपये उत्पन्न कमवून दाखवले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या अवलिया तरुणाची यशोगाथा जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरं पाहता हरवेंद्रसिंग शेतकरी कुटुंबातून येतात. घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची असल्याने त्यांना बारावीनंतर शिक्षण घेता आले नाही. खरं पाहता बारावी नंतर त्यांना इंजिनिअरिंग करायची होती या अनुषंगाने त्यांनी पन्नास हजार रुपये लखनऊ येथील एका संस्थेमध्ये जमा देखील केले होते. मात्र नंतर त्यांना ही संस्था बोगस असल्याचे समजले. यामुळे त्यांचे पन्नास हजार रुपये वाया गेले. 50 हजार रुपये वाया गेलेत शिवाय त्यांच्या घरच्यांनी देखील त्यांना त्याबद्दल सुनावले.
परिणामी त्यांना बारावीनंतर शिक्षण चालू ठेवता आले नाही. यानंतर ते हरियाणामध्ये गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी दहा वर्षे खाजगी कंपनीत काम केले. यानंतर ते आपल्या जन्मभूमीत परतले. हरवेंद्रसिंग आता चार वर्षांपासून मत्स्य पालन व्यवसाय करत आहेत. विशेष म्हणजे आजच्या घडीला मत्स्यपालन व्यवसायातून ते वार्षिक दोन कोटी रुपयांची कमाई करत आहेत.
दररोज 100 रुपये मजुरी
अमरोहा येथील रहिवासी हरवेंद्र सिंह सांगतात की, 2008-09 मध्ये जेव्हा लग्न झाले तेव्हा घरखर्च चालवणे कठीण झाले होते. मोठा भाऊ हरियाणात राहत होता, जो गुरुद्वारात होता. त्याने त्यांना बोलावले. अनेक दिवस तो वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन कंत्राटदाराला जॉब विचारत होता. अनेकांनी त्यांच्याकडे काम नसल्याचे सांगितले, तर अनेकांनी त्यांना फटकारले आणि हाकलून दिले. त्यानंतर त्याला एका कंत्राटदाराने दिवसाला 100 रुपये म्हणजेच महिन्याला 3 हजार रुपये पगाराने काम दिले.
भावाने 2016 मध्ये सुरू केली मत्स्यशेती
हरवेंद्र सिंह सांगतात की, 2016 मध्ये मोठा भाऊ वरुण सिंह यांना वाटले की गुरुद्वारामध्ये राहून जे कमाई करत आहे त्यातून घर चालवणे शक्य नाही. मुलं मोठी होत होती. घरात अभ्यास आणि लेखनाचा ओढा वाढत होता. मग भाऊ घरी आला आणि मत्स्य पालन व्यवसाय करू लागला. हळुहळू तलावांची संख्या वाढत गेली आणि आज करोडोंचा नफा होत आहे. हरवेंद्र सांगतात की, जेव्हा भावाने मत्स्यपालन सुरू केले तेव्हा त्यांच्या भावाने त्यांना देखील हरियाणातून गावाकडे बोलावले.
त्यांचे संयुक्त कुटुंब आहे. गावाकडे परतल्यानंतर हरवेंद्र आणि त्यांचे भाऊ एकत्र कामाला लागले. घरच्यांना सांगितल्यावर ते वेडे म्हणाले. नोकरी सोडून हे काम सुरू करणार असल्याचे सांगितले. उच्चवर्णीय लोक अद्यापही मत्स्य पालन व्यवसायाला कमी लेखतात. त्यांचे वडील म्हणाले की शेती करायला जमीन आहे. तलाव बनवून कचरा करू नका. मग काय हरवेंद्रने आधी गावातील सरकारी तलाव भाडेतत्त्वावर घेतला. तेथे त्याने मासेमारी सुरू केली. पहिल्या वर्षी प्रचंड नफा झाल्यावर त्यांनी आपल्या शेतात शेततळे बनवायला सुरुवात केली.
16 एकर जागेत तलाव तयार करून मत्स्यपालन-
हरवेंद्र यांनी प्रथम 4 एकरात तलाव तयार करून मत्स्यशेती सुरू केली. सध्या ते 16 एकरात मत्स्यशेती करत आहेत. ते कोलकाता येथून मत्स्यबीज आणतात आणि आंध्र प्रदेशातून माशांसाठी आवश्यक खाद्य आणतात. हरवेंद्र सांगतात की इथे जवळ फीडसाठी कंपनी नाही. आता काही कंपनीने राज्यात प्लांट उभारण्यास सुरुवात केली आहे. असे झाले तर त्यांना याचा फायदा होणार आहे.
इतरांना देखील देतो प्रशिक्षण
हरवेंद्र सांगतात की त्यांच्या आजूबाजूला सुमारे 3 हजार एकर क्षेत्रात शेतकरी मत्स्यशेती होतं आहे. हरवेंद्र त्यांना मार्गदर्शन करतो. त्या बदल्यात शेतकऱ्यांकडून तो 5,000-10,000 रुपये असे निश्चित पैसे घेतो. अगदी राजस्थान, मध्य प्रदेश, बिहार यांसारख्या राज्यातूनही शेतकरी येऊन त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतात.तो स्वतःचे यूट्यूब चॅनेल देखील चालवतो, ज्यावर तो मत्स्यपालनाशी संबंधित माहिती अपलोड करतो. निश्चितच शंभर रुपये रोजाने काम करणाऱ्या या तरुणाने मत्स्यपालन व्यवसायात नेत्रदीपक कामगिरी करून इतरांसाठी प्रेरणा देण्याचे काम केले आहे.