Success Story : मित्रांनो अलीकडे शेती व्यवसायात (Farming) उच्चशिक्षित तरुण देखील हिरीरीने भाग घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे उच्चशिक्षित तरुण आपल्या ज्ञानाचा शेती व शेतीपूरक व्यवसायात (Agriculture Business) योग्य तो वापर करून लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) करण्याची किमया साधता आहेत.
आज आपण अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar District) अशाच एका युवती विषयी जाणून घेणार आहोत. या तरुणीने अगदी कोवळ्या वयात वडिलांना मदत म्हणून पशुपालन व्यवसायात (Animal Husbandry) पदार्पण केले आहे. आणि आज अवघ्या 23व्या वर्षी ही नवयुवती पशुपालन व्यवसायातून तब्बल 72 लाख रुपयांची वार्षिक कमाई करत आहे.
यामुळे सध्या या नवयुवतीची संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे नव्हे तर संपूर्ण भारतात चर्चा रंगली आहे. आज आपण देखील या नवयुवतीचा जीवन प्रवास थोडक्यात पण सविस्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोण आहे ही तरुणी
मित्रांनो अहमदनगर जिल्ह्यातील निघोज येथील श्रद्धा धवन या तरुणीने म्हैस पालन व्यवसायातून 72 लाख रुपये कमावण्याची किमया साधली आहे. अहमदनगर जिल्हा मुख्यालयापासून साठ किलोमीटर अंतरावर वसलेल्या या छोट्याशा गावातून निघालेली ही तरुणी आजच्या घडीला संपूर्ण भारत वर्षात प्रसिद्ध आहे. विशेष म्हणजे श्रद्धा आठवण यांच्या कार्यामुळे अनेक तरुणांना प्रेरणा मिळाली आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की श्रद्धा यांचे वडील सत्यवान हे म्हैस पालन करत असत. मात्र त्यांचे वडील दिव्यांग होते. या परिस्थितीत त्यांना म्हशीचे दूध विक्री करण्यासाठी अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागे. 2011 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की त्यांच्या वडिलांना हा व्यवसाय सांभाळता येणे अशक्य बनले.
अशा परिस्थितीत श्रद्धा यांनी आपल्या वडिलांना मदत म्हणून पशुपालन व्यवसायास सुरुवात केली आहे. यावेळी श्रद्धा अवघ्या अकरा वर्षांची होती. म्हणजेच श्रद्धा वयाच्या अकराव्या वर्षापासून पशुपालन व्यवसाय करत आहे. विशेष म्हणजे त्यांनी पशुपालन व्यवसायासोबतच आपल शिक्षण देखील ठेवले आहे.
लहान वयात बाईक चालवायला शिकली
श्रद्धा धवन म्हणते की, ‘भाऊ लहान होता आणि वडील बाइक चालवण्याच्या स्थितीत नव्हते. वडिलांनी सोपवलेली जबाबदारी तिला पार पाडायची होती. म्हणूनच मी पहिल्यांदा बाईक चालवायला शिकले. सकाळी माझे वर्गमित्र शाळेत जायच्या तयारीत असत, तेव्हा मी बाईकवरून आजूबाजूच्या गावात दूध वाटप करत असे.
त्यानंतर शाळेतही जात असे. श्रद्धा धवनवर विश्वास ठेवला तर 1998 मध्ये वडिलांकडे फक्त सहा म्हशी होत्या. त्यानंतर मुलीच्या हाती पशु पालन व्यवसायाची जबाबदारी आल्यावर धवन कुटुंबाच्या या डेअरी फार्मला श्रद्धा अॅनिमल प्रमोशन अँड मिल्क बिजनेस ट्रेनिंग सेंटर निघोज असे नाव देण्यात आले आणि म्हशींची संख्या 80 झाली.
दुमजली गोठा बांधला
श्रद्धा यांनी निघोज येथे म्हशीसाठी दुमजली गोठा बांधला आहे. शिवाय मजुरांचीही मोठी फौज आहे. येथून दररोज 450 लिटर दुधाची विक्री होत आहे. 6 लाख रुपये प्रति महिना या दराने श्रद्धा एका वर्षात 72 लाख रुपये कमावते आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, श्रद्धा धवनने 2020 मध्ये बॅचलर डिग्री मिळवली आहे.
भौतिकशास्त्रात मास्टर्स करत आहे. ती या विषयावर विद्यार्थ्यांना ऑनलाइन गेस्ट लेक्चरही देते. 2015 मध्ये श्रद्धाने दहावीची परीक्षा दिली होती. तेव्हा रोज फक्त 150 लिटर दूध विकले जात होते आणि म्हशीही 45 होत्या. मात्र आता दोन्ही बाबतीत वाढ झाली आहे. शिवाय त्यांनी आपले शिक्षण देखील पूर्ण केले आहे.