Success Story : मित्रांनो अलीकडे सुशिक्षित तरुण शेती (Farming) व शेतीपूरक व्यवसायात (Agriculture Business) चांगली कामगिरी करतांना पहायला मिळत आहेत. विशेष म्हणजे हे सुशिक्षित तरुण आपल्या ज्ञानाचा शेती व्यवसायात (Farming Business) उपयोग करत लाखो रुपयांची कमाई (Farmer Income) करत आहेत.
आज आपण बिहार मधील अशाच एका उच्चशिक्षित तरुणांची यशोगाथा जाणून घेणार आहोत. बिहार राज्यातील बेगूसराय येथील कुणाल कुमार झा यांनी आयटी टेक्निकलच शिक्षण घेतल्यानंतर एका प्रायव्हेट कंपनीत 18 हजारांच्या पगारावर नोकरी केली. कुणाल कुमार यांना नोकरी करणं पसंत नव्हतं त्यांना शेती वं शेतीशी संबंधित व्यवसाय करायचे होते.
मग काय त्यांनी नोकरीवर तुळशीपत्र ठेवण्याचा मोठा धाडसी निर्णय घेतला. आपल्या अठरा हजाराच्या नोकरीला लाथ मारत शेती (Farming) करण्याचा निर्णय घेतला. कुणाल यांनी मोत्यांची शेती करण्याचं ठरवलं. आजच्या घडीला कुणाल मोतीच्या शेतीमधून अडीच ते तीन लाख रुपयांची कमाई करत आहे.
10 बाय 10 चौरस फुटात सुरु झाली पर्ल फार्मिंग
तरुण शेतकरी कुणालने नोकरी सोडून मोत्यांची शेती (Pearl Farming) सुरू केली. कुणालने स्वतःच्या घरातूनच शेतीला सुरुवात केली. तो आपल्या घरामध्ये 10 बाय 10 स्क्वेअर फुटाच्या टाकीत आधुनिक पद्धतीने मोत्यांची लागवड करत आहे. त्यांची ही पद्धत बेगुसरायमध्ये चांगलीच लोकप्रिय होत आहे. मोत्यांच्या शेतीमुळे कुणाल यांना पंचक्रोशीत एक वेगळी ओळख मिळाली आहे.
कुणालने भगवान राम, भगवान कृष्ण आणि इतर देवांच्या कलाकृती असलेले अतिशय सुंदर मोती तयार केले आहेत. कुणाल यांच्या मते मोत्यांचे उत्पादन एकूण दहा महिन्यात येते. मोतीच्या शेतीसाठी जर एक लाख रुपये खर्च आला तर त्यातून जवळपास तीन लाख रुपयांचे मूर्ती मिळत असतात. म्हणजेच पर्ल फार्मिंग मधून शेतकरी बांधवांना 1 लाख रुपये खर्च करून दोन लाखांचा निव्वळ नफा मिळत असतो. निश्चितच शेतकऱ्यांसाठी कमी जागेत आणि कमी खर्चात सुरू करता येणारे पर्ल फार्मिंग एक फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो.