Success Story : अलीकडे नवयुवक शेतकरी पुत्र शेतीपासून (Farming) दुरावत आहेत. मात्र असे असले तरी देशात असेही अनेक नवयुवक आहे जे शेती व्यवसायातून लाखो रुपये उत्पन्न (Farmer Income) कमावण्याची किमया साधत आहेत. विशेष म्हणजे आता नोकरी सोडून देखील नवयुवक शेतीमध्ये (Agriculture) पदार्पण करत आहेत. उत्तर प्रदेश राज्यातील सीतापुर तालुक्यातून देखील असंच एक उदाहरण (Farming Success Story) समोर आल आहे.
सीतापुर येथील नवीन मोहन राजवंशी (Successful Farmer) या तरुणाने देखील चक्क परदेशातली नोकरी सोडून शेती व्यवसायात उतरत नेत्रदिपक यश संपादन केले आहे. नवीन यांनी चेन्नई येथील AMIT या कॉलेजमधून एमबीए केलं. एमबीए केल्यानंतर दुबई मधे काही काळ नोकरी देखील केली. दुबईमध्ये बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर या पदावर ते कार्यरत होते. त्यांना चांगला पगार देखील मिळत होता. मात्र असे असतानाही त्यांनी स्ट्रॉबेरी शेतीला (Strawberry Farming) सुरुवात केली आहे आणि स्ट्रॉबेरी शेतीतून चांगली कमाई देखील करत आहेत.
नोकरीच्या काळात नवीन जेव्हा दुबईतील कोणत्याही शेतात जायचे तेव्हा त्याला वाळवंटातही चांगली पिके येत असल्याचे दिसायचे. येथून नवीनच्या मनात शेतीची आवड निर्माण झाली. त्यांनी भारतात परतण्याचा निर्णय घेतला. 2020 मध्ये, त्यांना कोविडमुळे मायदेशी परतावे लागले. मायदेशी परतल्यानंतर त्यांनी शेती व्यवसायात करिअर बनवण्याचा निर्णय घेतला. त्यांनी सीतापूर कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने आधुनिक तंत्रज्ञानाने स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रशिक्षण घेतले.
अशा प्रकारे शेत तयार केले जाते
नवीन मोहन राजवंशी सांगतात की, ते आधी शेताची चांगली नांगरणी करत असतात. ट्रायकोडर्मा, सोडोमोनास, देशी गूळ शेणात मिसळून कंपोस्ट तयार करतात. हे खत संपूर्ण शेतात फवारल्यानंतर रोटाव्हेटरने नांगरणी केली जाते. बेड मेकरने बेड बनवला जातो, एक ते दोन दिवस बेड तसेच राहू दिले जातात आणि त्यात ठिबक सिंचन प्रणाली बसवली जाते जेणेकरून संतुलित प्रमाणात पाणी प्रत्येक झाडापर्यंत पोहोचेल.
तीन लाख खर्च सहा लाख कमाई
नवीन यांच्या एक एकर शेतात प्रत्येकी एक फूट अंतरावर सुमारे 20 हजार रोपांची लागवड करण्यात आली आहे. या अंतरावर स्ट्रॉबेरीची रोपे लावल्यामुळे झाडामध्ये बुरशीची समस्या उद्भवत नाही. शिवाय रोपांमध्ये पुरेस अंतर असल्याने स्ट्रॉबेरी पिकाची काळजीही खूप चांगली घेतली जाते. नवीन यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एक एकरात 150 ते 160 क्विंटल उत्पादन मिळते. त्याचवेळी खर्चाबाबत बोलायचे झाले तर एका एकरात पहिल्या वर्षी ठिबकला तीन लाख रुपये खर्च येतो.
मात्र काही महिन्यांत, खर्चाच्या दुपटीने उत्पन्न मिळत असल्याचे नवीन नमूद करतात. म्हणजे 3 लाख रुपये खर्च करून त्यांना जवळपास 6 लाखांहून अधिक कमाई होतं आहे. शिवाय इतर पिकांतून देखील नवीन यांना चांगला नफा मिळतं आहे. स्ट्रॉबेरीसोबतच नवीन यांनी स्ट्रॉबेरी पिकाच्या मध्यभागी झेंडूची लागवड केली आहे. म्हणजे स्ट्रॉबेरीच्या पिकात नवीन आंतरपीक देखील घेत असतात.
झेंडूपासून 50 हजार रुपयांचे उत्पन्न मिळते, झेंडूचे पीक संपले की खरबूज लावतो, खरबूज तयार होईपर्यंत स्ट्रॉबेरी संपते. एक एकरात खरबूजाचे सरासरी उत्पादन 160 ते 170 क्विंटल असते. नवीन स्वतः स्ट्रॉबेरी शेतीतून लाखों रुपयांची कमाई करत आहेत. शिवाय गावातील इतरांना रोजगार देखील उपलब्ध करून देत आहेत. यामुळे इतर शेतकऱ्यांना देखील प्रेरणा मिळत आहे.