Success Story: भारत हा प्रतिभावान लोकांचा देश म्हणून ओळखला जातो. देशातील नवयुवक आपल्या मेहनतीच्या आणि बुद्धिमत्तेच्या जोरावर जगाच्या पाठीवर भारताचे नाव उंच करत असतात. देशातील अनेक नवयुवक शेतकरी (Farmer) पुत्र देखील आपल्या जिद्दीच्या जोरावर विपरीत परिस्थितीत सुद्धा आपल्या नावाचा डंका वाजवत असतात.
पश्चिम बंगालच्या कोलकत्ता (Kolkata) येथील एका शेतकऱ्याच्या पोरांनी (Farmer Son) देखील काहीशी अशीच किमया साधली आहे. कोलकताच्या शेतकऱ्याच्या मुलाला फेसबुक कडून तब्बल 1.8 कोटींचे पॅकेज मिळालं आहे.
यामुळे जाधवपूर विद्यापीठात (Jadhavpur University) शिकणाऱ्या या शेतकऱ्याच्या पोराचं सध्या संपूर्ण देशात नाव गाजत आहे. बीसाख मंडळ नामक जाधवपूर विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांने आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर फेसबुक या कंपनीत तब्बल 1.8 कोटींचा पॅकेज घेऊन सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे.
बीसाख मंडळ हा जाधवपूर विद्यापिठात कम्प्युटर सायन्स चे शिक्षण घेत आहे. तो आपल्या पदवीच्या तिसऱ्या वर्षात आहे. बीसाख बिरभूम तालुक्याच्या मौजे रामपूरहाट येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातून (Farming Farmily) येतो. त्याचे वडील शेतकरी आहेत व त्यांच्या मातोश्री अंगणवाडी सेविका म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती ही बेताची आहे अर्थात बीसाख मध्यमवर्गीय कुटुंबातील आहेत.
त्यांनी मिळवलेल्या या नेत्रदीपक यशामुळे पंचक्रोशीत त्यांचे मोठे कौतुक केले जात आहे. लवकरच बीसाख लंडन साठी रवाना होणार असल्याचे सांगितले जात आहे. निश्चितच मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेल्या या शेतकऱ्याच्या पोरांन आपले व आपल्या परिवाराचा मान-सन्मान वाढवला आहे.
बीसाख यांच्या यशाने पुन्हा एकदा भारतीयांचे नाव साता समुद्रापार गाजत आहे. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, याआधीदेखील जाधवपूर विद्यापीठातील एकूण नऊ विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिकच पॅकेज मिळाले आहे. विशेष म्हणजे हे सर्व इंजिनिअरिंगचे विद्यार्थी होते. आता बीसाख यांनी 1.8 कोटींचं पॅकेज मिळवून या यादीत आपले नाव समाविष्ट केले आहे.
मित्रांनो खरं पाहता बिसाख मंडल यांना फेसबुक कडूनचं ऑफर मिळाली असे नाही याआधी त्याला गुगल आणि अॅमेझॉनकडून देखील ऑफर आल्या होत्या. मात्र फेसबुकने जास्त मानधन दिले असल्याने त्यांनी फेसबुक मध्ये नोकरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यांच्या यशामुळे जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक भारावून गेले आहेत. हाती आलेल्या माहितीनुसार बिसाख सप्टेंबरमध्ये फेसबुक जॉईन करेल. त्याची पोस्टिंग लंडनमध्ये झाली आहे. निश्चितच शेतकऱ्याच्या पोराचं हे यश इतर शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.