Success Story : भारतात गेल्या काही वर्षांपासून शेतीमध्ये (farming) मोठा बदल केला जात आहे. विशेष म्हणजे आता शेतीमध्ये (agriculture) उच्चशिक्षित लोक देखील पदार्पण करत असल्याचे चित्र आहे. असे उच्च शिक्षीत लोक शेतीमध्ये आपल्या ज्ञानाचा योग्य वापर करत शेतीतून लाखो रुपयांची कमाई (farmer income) करण्याची किमया देखिल साधत आहेत.
मित्रांनो एकेकाळी शेती म्हणजे केवळ हा आतबट्ट्याचा व्यवहार असं समजलं जायचं मात्र आता शेतीमध्ये नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करतात तसेच पीक पद्धतीत बदल करत शेतकरी बांधव शेतीतून लाखों रुपये कमवत आहेत.
शेतकरी बांधव आता पारंपरिक पिकांऐवजी कमी कालावधीत तयार होणाऱ्या भाजीपाला वर्गीय पिकांची (vegetable crop) देखील मोठ्या प्रमाणात शेती करत असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे भाजीपाला शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत असून भाजीपाला पिकातून लाखो रुपये शेतकरी बांधव आहेत. मध्यप्रदेश मधील रीवा जिल्ह्यातील एका शेतकऱ्याने देखील काहीसं असंच केल आहे.
रिवा येथील नृपेंद्र सिंग नामक व्यक्तीने आयटीआय केल्यानंतर जॉब न मिळाल्याने शेती करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला त्यांनी पारंपरिक पिकांची शेती सुरू केली. त्यांना उत्पादन देखील चांगले मिळाले मात्र उत्पन्न अपेक्षित असे मिळत नव्हतं. हेच कारण होतं की त्यांनी बागायती तसेच तरकारी पिकांकडे वळण्याचा निर्णय घेतला.
मग काय कृषी तज्ञांचा सल्ला घेतला आणि 2019 मध्ये भाजीपाला पिकांची शेती करण्यास सुरुवात केली. यामध्ये फ्लॉवर कोबी वांगी यांसारखी भाजीपाला पिकांची शेती त्यांनी सुरू केली. विशेष म्हणजे तरकारी किंवा भाजीपाला पिकाच्या शेतीतून त्यांना चांगली कमाई होऊ लागली आणि आजच्या घडीला भाजीपाला लागवडीतून ते वर्षाकाठी सहा लाख रुपयांची कमाई करत आहेत.
नृपेंद्र सिंग आपल्या एक एकर शेतात वांग्याची शेती (brinjal farming) करत आहेत. वांगी लागवड करण्याआधी ते जमिनीची चांगली नांगरट करून रोटावेटर ने जमीन भुसभुशीत करतात. यानंतर मशीनच्या साहाय्याने वांगी लागवड करण्यासाठी बेड तयार करतात. बेड तयार झाल्यानंतर ते रोपवाटिकेत तयार झालेल्या सुधारित वानांच्या वांग्याची रोपांची लागवड करत असतो. रोपांची लागवड करण्याआधी ते बेडवर डीएपी या खताचा वापर करतात. त्यामुळे त्यांना वांग्याचे अधिक उत्पादन मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
फक्त वांग्याच्या पिकातूनच त्यांना आता तीन ते चार लाख रुपयांची कमाई होत आहे. याशिवाय फुलकोबीच्या शेतीतून त्यांना पन्नास हजाराचे उत्पन्न मिळत आहे तसेच बंद कोबीच्या शेतीतून त्यांना 80 हजारांची कमाई होत आहे. तसेच मुळा शेतीतून त्यांना 60 हजारांची कमाई होत आहे. याशिवाय ते आपल्या शेतात कांदा या पिकाची देखील शेती करत आहेत. याशिवाय ते आपल्या दहा एकर शेतात हंगामानुसार भात तसेच गहू पिकाची देखील लागवड करत आहेत. निश्चितचं नृपेंद्र सिंग यांनी शेतीमध्ये काळाच्या ओघात बदल करत इतर शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक काम केले आहे.