Success Story : मित्रांनो खरे पाहता आजच्या काळात, लोक चांगले शिक्षण घेऊन नोकरी करण्याचे स्वप्न पाहत आहेत. विशेष म्हणजे आता शेतकरी पुत्र (Farmer) देखील शेती (Farming) नको रे बाबा असा ओरड करत आहेत. शेतकरी बांधव देखील आपल्या पाल्याने चांगले उच्च शिक्षण घ्यावे आणि एखाद्या मल्टिनॅशनल कंपनीत किंवा सरकारी नोकरदार म्हणून काम करावे असे स्वप्न पाहत आहेत. मात्र राजस्थानमधील एका अवलियाने नोकरी (Job) सोडून शेतीला निवडल आहे.
विशेष म्हणजे काळया आईने या अवलियाला भरभरून दिलं आहे. राजस्थानमधील श्री गंगानगर जिल्ह्यातील देसली गावात राहणारे रवी बिश्नोई यांनी शहरी जीवनापासून दूर राहून गावातच शेती (Agriculture) करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी 15 वर्षांचं न्यूज रिपोर्टिंगचं करिअर सोडून राजस्थानमधील बिकानेर येथे शेती करण्यास सुरुवात केली. 2020 मध्ये रवी बिश्नोई (Successful Farmer) यांनी पत्रकारिता सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला आहे.
विशेष म्हणजे त्यांनी घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी मोठा फायद्याचा ठरला असून त्यांना शेतीमधून लाखों रुपयांची कमाई (Farmer Income) होत आहे. यामुळे सध्या हा अवलिया चांगल्याच चर्चेत आला आहे. रवी सांगतात की, कोरोनाच्या काळात तो आई-वडील, पत्नी आणि मुलांसह त्याच्या शेतात पोहोचला.
कोरोनाच्या दीड वर्षाच्या काळात रवीने कुटुंबाच्या पाठिंब्याने स्वतःच्या जमिनीवर शेती करण्यास सुरुवात केली. रवी सांगतो की जेव्हा तो कुटुंबासह शेतात पोहोचला तेव्हा संपूर्ण जमीन अशीच उजाड होती. मात्र त्यानंतर त्यांने अहोरात्र काबाडकष्ट करून ओसाड पडलेल्या जमिनीत शेती यशस्वीरित्या करून दाखवली आहे.
शेती सुरू करण्यासाठी प्लॉट विकावा लागला होता बर
रवीने शेती सुरू केली तेव्हा त्यांना या कामासाठी सुमारे 15 लाख रुपये खर्च करावे लागले. त्यांनी सांगितले की, त्यावेळी त्यांच्याकडे शेतीमध्ये गुंतवणूक करण्यासाठी 15 लाख रुपये नव्हते, त्यामुळे त्यांनी त्यांचा एक प्लॉट विकला. हा भूखंड रवीच्या वडिलांनी बिकानेरमध्ये खरेदी केला होता. रवी सांगतात की, जर कोरोनाचा काळ नसता तर या प्लॉटची किंमत जवळपास 25 लाख रुपये असती. मात्र कोरोनामुळे त्यांना खरेदीदार मिळत नव्हते.
अशा परिस्थितीत त्यांनी हा भूखंड केवळ 15 लाखांना विकला. पंधरा लाखांना प्लॉट विकून शेती सुरू केली. मात्र कोरोनाच्या काळात बाजार समित्या बंद होत्या, अशा परिस्थितीत त्यांनी उत्पादित केलेला भाजीपाला बाजारात पोहोचू शकला नाही. त्यामुळे रवीला सुरुवातीला फायदा झाला नाही. मात्र, त्यांनी शेतीसाठी लावलेला सर्व खर्च त्यांना परत मिळाला.
रवीची शेती कशी करतो बर..?
रवीने सांगितले की, तो आपल्या शेतात भोपळा, कारले, काकडी, टोमॅटो अशा वेणी वर्गीय भाजीपाल्याची लागवड करतो. रवीने सांगितले की, त्याने पूर्णपणे सेंद्रिय शेती सुरू सुरु केली आहे. पण त्याचे परिणाम फारसे चांगले नव्हते. यानंतर, झाडे आणि वनस्पतींचे कीटक आणि कोळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी त्यांना रासायनिक गोष्टींचा अवलंब करावा लागला.
मात्र, रवी सांगतात की तो जवळपास 90 टक्के सेंद्रिय शेती करतो. रवी सध्या शेतीतून कमाई करत असून त्यांना गावाकडचे आयुष्य आवडत आहे. शेतात रवी यांनी जे शेतकरी पुत्र शेतीमध्ये काहीच ठेवलेलं नाही असं बोलतात त्यांच्यासाठी आरसा दाखवण्याचं काम केल आहे.