Strawberry Farming : लाल चुटक स्ट्रॉबेरी खाने कोणाला पसंत नाही. तुम्हालाही स्ट्रॉबेरी खाणे आवडते ना? हो आवडतच असेल, पण तुम्ही कधी विचार केला आहे का स्ट्रॉबेरी उत्पादन भारतात कोणकोणत्या राज्यात होते. नाही ना मग आज आपण याच बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर स्ट्रॉबेरी ची शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. याची लागवड देशातील काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात केली जात आहे. आपल्या महाराष्ट्राबाबत बोलायचं झालं तर राज्यातील सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर व आजूबाजूच्या परिसरात मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी लागवड केली जाऊ लागली आहे.
याशिवाय राज्यात इतरही अनेक ठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते. विशेष म्हणजे राज्यातील शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरीच्या पिकातून लाखो रुपयांची कमाई होत आहे. शेतकऱ्यांच्या अशा अनेक यशोगाथा तुम्ही ऐकल्या असतील.
अशा परिस्थितीत आज आपण भारतातील कोणत्या राज्यात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक उत्पादन होते? तसेच आपल्या महाराष्ट्राचा देशात स्ट्रॉबेरी उत्पादनात कितवा क्रमांक लागतो हे देखील आज आपण पाहणार आहोत. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
स्ट्रॉबेरी उत्पादनातील टॉप 10 राज्य
देशातील स्ट्रॉबेरी उत्पादनाचा विचार केला असता हरियाणा, महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, मिझोरम आणि मेघालय या राज्यांचा टॉप 5 स्ट्रॉबेरी उत्पादक राज्यांमध्ये समावेश होतो.
मेघालय मध्ये देशाच्या एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी 7.91% एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते आणि हे राज्य स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या बाबतीत देशात पाचव्या क्रमांकावर विराजमान आहे.
यानंतर मिझोराम या राज्यात 7.97% एवढे स्ट्रॉबेरीचे उत्पादन घेतले जाते आणि हे राज्य स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या बाबतीत देशात 4थ्या क्रमांकावर विराजमान आहे.
स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या बाबतीत जम्मू-काश्मीर या राज्याचा तिसरा क्रमांक लागतो आणि येथे देशातील एकूण स्ट्रॉबेरी उत्पादनापैकी जवळपास 20 टक्क्यांहून अधिकचे उत्पादन घेतले जाते.
स्ट्रॉबेरी उत्पादनाच्या बाबतीत आपल्या महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो आणि महाराष्ट्रात देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 24.25% एवढे स्ट्रॉबेरी चे उत्पादन घेतले जाते. दरम्यान देशात हरियाणा या राज्याचा स्ट्रॉबेरी उत्पादनाचा बाबतीत पहिला क्रमांक लागतो.
या राज्यात स्ट्रॉबेरीचे 31.50% एवढे उत्पादन घेतले जाते. तसेच स्ट्रॉबेरी उत्पादनात मध्य प्रदेशचा 6 वा, हिमाचल प्रदेशचा 7वा, तामिळनाडूचा 8वा, झारखंडचा 9 वा आणि केरळचा 10वा नंबर लागतो.