State Government Decision : सध्या संपूर्ण देशभरात आगामी लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आणि काही राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार असल्याने या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. सर्वत्र सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत.
यानिमित्ताने पाच वर्षातून एकदा का होईना पण मतदार राजा सरकारला आठवला आहे. सरकारला निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य जनतेची काळजी वाटू लागत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीचा हंगाम पाहता आता सरकारच्या माध्यमातून विविध घोषणा केल्या जात आहेत. वेगवेगळ्या कल्याणकारी योजनेची मुहूर्तरोढ रोवली जात आहे.
नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील मोदी सरकारने निवडणुकीचा काळ पाहता देशातील सर्वसामान्य गरीब महिलांना खुश करण्यासाठी गॅस सिलेंडरच्या किमती 200 रुपयांपर्यंत कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय उज्वला योजनेच्या लाभार्थ्यांसाठी घेण्यात आला असून गॅस अनुदानाच्या रकमेत देखील वाढ झाली आहे. अशातच आता देशातील काही महिलांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे.
ही बातमी राजस्थान येथील महिलांसाठी खास ठरणार आहे. राजस्थान येथील अशोक गेहलोत सरकारने काँग्रेस पुन्हा एकदा राजस्थानच्या सत्तेत आले तर कुटुंबातील कर्त्या महिलेला वार्षिक दहा हजार रुपयांचा सन्मान निधी दिला जाईल अशी मोठी घोषणा केली आहे. याशिवाय राज्यातील पाच कोटी कुटुंबांना फक्त पाचशे रुपयात गॅस सिलेंडर देण्याची मोठी घोषणा यावेळी राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी केली आहे.
यामुळे सध्या या घोषणेची सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. एकंदरीत, आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख पक्ष आपली दावेदारी मजबूत करण्यासाठी आता युद्धपातळीवर कामाला लागले आहेत.
पण सर्वसामान्य जनता, मतदार राजा अजूनही अच्छे दिन येण्याची वाट पाहत आहे. मात्र आता निवडणुका जवळ आल्या असल्याने पुन्हा एकदा सर्वसामान्य जनता केंद्रस्थानी आली आहे. सर्वसामान्य जनतेला खुश करण्यासाठी आता शासनाकडून विविध घोषणा केल्या जाणार आहेत.