Soybean Rate: मित्रांनो भारतात एकूण तीन हंगामात शेती (Farming) केली जाते. खरीप, रब्बी आणि उन्हाळी या तीन हंगामात शेतकरी बांधव विविध पिकांची शेती करत असतात. सध्या सुरू असलेल्या खरीप हंगामात (Kharif Season) आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीन या पिकाची (Soybean Crop) शेती केली जाते.
सोयाबीन हे महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे एक मुख्य पीक असून, अनेक शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण (Farmer Income) हे या पिकावर अवलंबून आहे. अशा परिस्थितीत, सोयाबीनच्या बाजारभावाकडे (Soybean Market Price) राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे नेहमीच लक्ष लागून असते. आम्ही देखील राज्यातील लाखो सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांच्या माहितीसाठी सोयाबीनचे दररोज बाजार भाव सांगत असतो.
आज आपण 8 तसेच 9 ऑगस्ट 2022 रोजी राज्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील सोयाबीनला बाजार भाव मिळाला ते आपण जाणून घेऊया. मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी येथे नमुद करु इच्छितो की दिलेले बाजार भाव हे क्विंटल या एकक मध्ये आहेत.
मार्केट | जात/प्रत | परिमाण | आवक | किमान दर | कमाल दर | ऍव्हरेज |
लासलगाव | – | क्विंटल | 632 | 3,000 | 6,351 | 6,115 |
माजलगाव | – | क्विंटल | 409 | 5,500 | 5,960 | 5,800 |
चंद्रपूर | – | क्विंटल | 18 | 5,935 | 5,935 | 5,935 |
सिल्लोड | – | क्विंटल | 17 | 5,800 | 6,000 | 5,900 |
कारंजा | – | क्विंटल | 1800 | 5,750 | 6,250 | 6,125 |
श्रीरामपूर | – | क्विंटल | 5 | 6,000 | 6,050 | 6,025 |
लासूर स्टेशनं | – | क्विंटल | 36 | 5,700 | 5,900 | 5,850 |
तुळजापूर | – | क्विंटल | 110 | 5,800 | 6,000 | 5,950 |
मोर्शी | – | क्विंटल | 52 | 5,800 | 6,050 | 5,925 |
राहता | – | क्विंटल | 14 | 6,070 | 6,100 | 6,085 |
भंडारा | डॅमेज | क्विंटल | 1 | 5,000 | 5,000 | 5,000 |
वर नमूद केलेले बाजार भाव 8 ऑगस्ट 2022 चे आहेत. आज नागपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत 400 क्विंटल सोयाबीनची आवक झाली आणि या वेळी किमान दर 5400 आणि कमाल दर 6202 आणि सर्वसाधारण दर सहा हजार रुपये राहिला.
मित्रांनो, आपला शेतमाल विक्रीसाठी कोणत्याही बाजार समितीत घेऊन जाण्यापूर्वी त्या बाजार समितीच्या कार्यालयात एकदा बाजार भाव संदर्भात चौकशी करणे अतिशय आवश्यक राहणार आहे. इथे दिलेली माहिती ही केवळ शेतकरी बांधवांना बाजारातील सर्वसाधारण परिस्थितीची माहिती करून देण्यासाठी दिली गेली आहे.