Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आत्ताच्या घडीची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांच्या दोन मागण्या मान्य केल्या आहेत. या निर्णयामुळे आगामी काळात सोयाबीनचे दर वाढणार असे बोलले जात आहे. महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की महाराष्ट्र, कर्नाटक आणि मध्य प्रदेश राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रातील सरकारने एक मोठा निर्णय घेतला.
या निर्णयानुसार, या तिन्ही राज्यांमध्ये केंद्र शासनाच्या माध्यमातून किमान हमीभावात म्हणजेच एमएसपीच्या दरात सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे. ही खरेदी तब्बल 90 दिवसांसाठी सुरु राहणार आहे.
खरंतर राज्यातील सोयाबीन उत्पादकांच्या माध्यमातून आणि कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून केंद्रातील मोदी सरकारकडे सोयाबीनची हमीभावाने खरेदी करावी तसेच खाद्यतेल, सोया मिल्क, सोया केक इत्यादी उत्पादने आयात करण्यास शुल्क लावावे आणि सोयाबीन निर्यातीसाठी प्रत्येक क्विंटलमागे किमान 50 डॉलर इतके अनुदान द्यावे अशा मागण्या केल्या जात होत्या.
याच मागणीसाठी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी गेल्या काही दिवसांमध्ये केंद्रातील मोदी सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला. केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्याकडे धनंजय मुंडे यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या या मागण्या पूर्ण कराव्यात आणि त्यांना दिलासा द्यावा यासंदर्भात विनंती केली होती.
महत्त्वाचे म्हणजे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या या विनंतीचा मान ठेवण्यात आला आहे. केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या दोन मोठ्या मागण्या मान्य केल्या आहेत. हमीभावाने खरेदी ही मागणी मान्य केली असून 90 दिवस खरेदी केली जाणार आहे.
त्यासोबतच आता खाद्यतेलावरील आयात शुल्क 20 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्रातील सरकारने शेतकऱ्यांच्या या दोन मागण्या मान्य केल्या असल्याने आगामी काळात सोयाबीनचे दर वाढण्याचे शक्यता आहे.
खरे तर खरीप हंगामातील सोयाबीनची येत्या काही दिवसात काढणी केली जाणार आहे. पुढील महिन्यात प्रत्यक्षात नवीन सोयाबीन बाजारात येणार आहे. अशातच शेतकऱ्यांसाठी सरकारने हे दोन निर्णय घेऊन त्यांना मोठा दिलासा दिला आहे.