Soybean Rate : सोयाबीन हे महाराष्ट्रात पिकवले जाणारे महत्त्वाचे नगदी पीक आहे. याची लागवड राज्यातील मराठवाडा आणि विदर्भ विभागातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळते. उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील याची कमी अधिक प्रमाणात लागवड होते. या पिकाच्या शेतीवर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. तथापि गेल्या दीड ते दोन वर्षांपासून या पिकाची शेती शेतकऱ्यांना परवडत नसल्याचे वास्तव पाहायला मिळत आहे.
याचे कारण म्हणजे पिवळं सोन म्हणून ओळखल जाणार सोयाबीन बाजारात अगदी कवडीमोल दरात विकल जात आहे. राज्यातील अनेक बाजारांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. यामुळे पिकासाठी आलेला खर्च देखील शेतकऱ्यांना भरून काढता येत नाहीये.
यंदाचा सोयाबीन हंगाम हा विजयादशमीपासून सुरू झाला असून आता सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीनचे बाजार भाव पाच हजाराचा टप्पा देखील गाठत नाहीयेत. यामुळे भाव वाढतील या आशेने साठवून ठेवलेले सोयाबीन देखील आता शेतकऱ्यांनी विक्रीसाठी बाहेर काढले आहे.
परिणामी राज्यातील बाजारांमध्ये सोयाबीन हंगाम अंतिम टप्प्यात आला असतानाही मोठ्या प्रमाणात आवक पाहायला मिळत आहे. दरम्यान, आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळतोय
अहमदनगर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज पिवळ्या सोयाबीनला किमान 4300 रुपये प्रति क्विंटल, कमाल 4350 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4350 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4000 कमाल 4495 आणि सरासरी 4400 असा भाव मिळाला आहे.
अमरावती कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4300 रुपये प्रति क्विंटल, कमाल 4427 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4363 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
बुलढाणा कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार रुपये प्रति क्विंटल, कमाल 4485 आणि सरासरी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
वाशिम कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार 180, कमाल 4500 रुपये आणि सरासरी 4375 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
यवतमाळ कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान चार हजार 23, कमाल 4497 आणि सरासरी ४३८१ रुपयाचा भाव मिळाला आहे.
लातूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 3500, कमाल 4573 आणि सरासरी चार हजार 404 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.
धाराशिव कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढा भाव मिळाला आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये सोयाबीनला किमान 4431, कमाल 4530 आणि सरासरी 4480 रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला आहे.