Soybean Rate : मित्रांनो भारतात तेलबिया पिकांची (Oilseed Crop) मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते. सोयाबीन (Soybean Crop) हे देखील एक प्रमुख तेलबिया पीक आहे. सोयाबीन हे खरीप हंगामातील (Kharif season) एक मुख्य पीक असून संपूर्ण भारत वर्षात याची शेती (Soybean Farming) विशेष उल्लेखनीय आहे.
संपूर्ण भारत वर्षाचा जर विचार केला तर सोयाबीन उत्पादनात मध्यप्रदेश प्रथम क्रमांकावर विराजमान असून दुसऱ्या क्रमांकावर महाराष्ट्राचा नंबर लागतो. अशा परिस्थितीत महाराष्ट्रात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र विशेष उल्लेखनीय असल्याचे चित्र आहे.
यामुळे महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे. मागील वर्षाचा जर विचार केला तर सोयाबीन आणि कापूस या खरीप हंगामातील दोन मुख्य पिकांना चांगला समाधानकारक बाजार भाव मिळाला होता.
कापसाला तर कधी नव्हे तो ऐतिहासिक बाजार भाव मिळाला. जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील वर्षी सोयाबीन आणि कापूस उत्पादनात अतिवृष्टी तसेच हवामानाच्या बदलामुळे मोठी घट झाली होती. तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कापसाला आणि सोयाबीनला मोठी मागणी निर्माण झाल्याने मागील वर्षी या दोन्ही पिकांना ऐतिहासिक बाजार भाव (soybean market price) मिळाला.
मागील वर्षी या दोन्ही पिकांना ऐतिहासिक बाजार भाव मिळाला असल्याने या दोन्ही पिकांच्या लागवडीत या वर्षी वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत होते. जाणकार लोकांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार सोयाबीन आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र या वर्षी उल्लेखनीय वाढले देखील आहे.
मात्र असे असले तरी या वर्षीदेखील मागील वर्षाप्रमाणेच हवामानात मोठा बदल बघायला मिळाला. अनेक ठिकाणी पावसाच्या लहरीपणामुळे या वर्षी सोयाबीन आणि कापूस लागवडीखालील क्षेत्र वाढले असताना देखील उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.
कधी अतिवृष्टी तर कधी पावसाची उघडीप तर कधी ढगाळ वातावरण या सर्वांमधून सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी मोठ्या शर्तीने सोयाबीनचे पीक वाचवले असून आता बाजारात नवीन सोयाबीन देखील दाखल होत आहे. ज्या ठिकाणी सोयाबीनची आगात पेरणी झाली होती तिथला सोयाबीन आता बाजारात येऊ लागला आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथील एका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने देखील हवामान बदलाचा सामना करत आपले सोयाबीन पीक मोठ्या शर्थीने जोपासले आणि आता या सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने नवीन सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणला होता.
लोणार तालुक्यातील विशाल केंदळे नामक सोयाबीन उत्पादक शेतकऱ्याने आपला 35 क्विंटल नवीन सोयाबीन वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिती येथे विक्रीसाठी आणला होता. वाशीम एपीएमसीमध्ये आलेल्या 35 क्विंटल नवीन सोयाबीनला 5701 रुपये प्रति क्विंटल एवढा बाजार भाव मिळाला आहे. दरम्यान वासिम एपीएमसीमध्ये प्रथमच नवीन सोयाबीन बाजारात आणणाऱ्या या सोयाबीन उत्पादक शेतकर्यांचा बाजार समिती प्रशासनाकडून सत्कार देखील करण्यात आला.