Soybean Rate : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी तब्बल दोन महिन्यानंतर थोडीशी दिलासादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे सोयाबीनच्या बाजार भावात वाढ झाली आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळत आहे. खरे तर, सोयाबीन हे एक कॅश क्रॉप म्हणून ओळखले जाते.
पण या पिकाची लागवड केल्या दोन वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या चालू हंगामात देखील सोयाबीन अपेक्षित असा भाव मिळत नसल्याने याची शेती शेतकऱ्यांना परवडत नाही.
राज्यातील अनेक महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव हमीभावापेक्षा कमी झाले आहेत परिणामी पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येणार नसल्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
एकतर गेल्यावर्षी अर्थातच डिसेंबर 2023 मध्ये जून ते सप्टेंबर या चार महिन्यांच्या काळात कमी पाऊस झाला आहे. याचा परिणाम म्हणून उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आहे. यामुळे सोयाबीनला अपेक्षित असा भाव मिळाला नाही तर शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे.
अशातच आता सोयाबीन बाजारभावात 50 ते 100 रुपयांची वाढ झाली असल्याने सोयाबीन उत्पादकांना दिलासा मिळाला असेल. दरम्यान आता आपण सोयाबीनचे बाजारभावात वाढ होण्याचे कारण काय हे थोडक्यात जाणून घेणार आहोत.
बाजार अभ्यासकांनी म्हटल्याप्रमाणे, सध्या सोयाबीनचे बाजार भाव 4600 रुपयांपासून ते हजार तीनशे रुपये पर्यंत नमूद केले जात आहे. अर्थातच गेल्या दोन दिवसांच्या बाजारभावाशी तुलना केली असता यामध्ये 50 ते 100 रुपये वाढ झाली आहे.
बाजारभावात वाढ होण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे पामतेलाच्या दरात झालेली वाढ. इंडोनेशिया आणि मलेशिया या प्रमुख पाम उत्पादक राज्यात एल निनोमुळे पाम उत्पादन कमी झाले आहे. यामुळे पामतेलाच्या दरात वाढ होत आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून तेलाचा पुरवठा कमी होत असल्याने याच्या बाजारभावात वाढ झाली आहे. याचा परिणाम म्हणून भारतात पामतेलाची आयात कमी झाली आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीन तेलाला आणि सूर्यफूल तेलाला मागणी आली आहे.
हेच कारण आहे की, प्रक्रिया उद्योगांमध्ये आणि बाजारात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची मागणी वाढत आहे. यामुळे दरात काहीशी सुधारणा होत आहे. दुसरीकडे, बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची आवक कमी होऊ लागली आहे.
अनेक शेतकऱ्यांनी सोयाबीन विकला असल्याने आता बाजारात खूपच कमी सोयाबीन येत आहे. यामुळे सोयाबीनचे सरासरी भाव 5000 रुपयांच्या पातळीपर्यंत येणार अशी आशा आहे. यामुळे ज्या शेतकऱ्यांना थांबता येईल अशा शेतकऱ्यांनी पाच हजाराचा टार्गेट ठेवावे असे बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.