Soybean Rate : सोयाबीनला पिवळं सोन म्हणून ओळखल जात. सोयाबीनची शेती राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये केली जाते. सोयाबीन हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक म्हणून ओळखले जाते. या चालू हंगामात सोयाबीनचे बाजारभाव हंगामाच्या अगदी सुरुवातीपासून दबावात आले आहेत.
यामुळे सोयाबीन उत्पादकांना मोठा फटका बसत आहे. सोयाबीनला बाजारात अपेक्षित असा दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांना पिकासाठी आलेला खर्च देखील भरून काढता येत नसल्याचे विदारक दृश्य पाहायला मिळतय.
अशातच, आज जागतिक बाजारातून सोयाबीन उत्पादकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. जागतिक बाजारात सोयाबीन, सोयापेंड आणि सोयातेलच्या भावात वाढ नमूद करण्यात आली आहे.
आम्ही आपणास सांगू इच्छितो की, जागतिक बाजारात तब्बल दीड महिन्यानंतर सोयाबीनच्या बाजार भावात थोडीशी सुधारणा नमूद करण्यात आली आहे. सोयाबीन तेलाच्या बाजारभावात देखील तीन महिन्यांनी विक्रमी सुधारणा झाली आहे.
सोयातेल तीन महिन्यांच्या उच्चांकी भावपातळीवर पोहोचले आहे. याचा परिणाम म्हणून आज देशातील प्रक्रिया प्लांटसमध्ये सोयाबीनचे भाव काहीसे वाढले आहेत. देशात आज प्रक्रिया प्लांट्सचे भाव काही प्रमाणात वाढले होते.
पण बाजार समित्यांमधील भावपातळी मात्र स्थिर पाहायला मिळाली. आज राज्यात सोयाबीनचे सरासरी भाव चार हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल तर 4500 रुपये प्रति क्विंटल यादरम्यान नमूद करण्यात आले आहेत.
दरम्यान जागतिक बाजारात सोयाबीन, सोया पेंड आणि सोया तेलच्या बाजारभावात सुधारणा झाली असल्याने देशांतर्गत बाजारात सोयाबीनचे भाव वाढणार का हा सवाल शेतकऱ्यांच्या माध्यमातून उपस्थित केला जात आहे. दरम्यान याच संदर्भात बाजार अभ्यासकांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.
बाजारातील तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, देशातील बाजारात सोयाबीनचे भाव लगेचच वाढणार नाहीत. पण, आंतरराष्ट्रीय बाजारात पुढील दीड ते दोन महिन्यांमध्ये आणखी ५ ते ७ टक्के वाढीची अपेक्षा बाजार अभ्यासकांच्या माध्यमातून वर्तवली जात आहे.
या भाववाढीचा परिणाम आपल्याही देशात दिसून येणार आहे. मात्र, भावात लेगच फार मोठ्या तेजीची शक्यता नाहीये. बाजार अभ्यासकांच्या मते आगामी काही दिवस दरात १०० रुपयांपर्यंत चढ उतार राहू शकते.
मात्र पुढील दोन महिन्यांमध्ये दरात १०० ते २०० रुपयांची सुधारणा होण्याची शक्यता आहे. एकंदरीत सोयाबीनचे भाव पाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या आतच राहतील असा अंदाज बाजार अभ्यासकांनी दिला आहे.