Soybean Pik Vima : मित्रांनो अनेकदा शेतकरी बांधवांना नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान सहन करावे लागते. अनेकदा अतिवृष्टीमुळे, दुष्काळामुळे किंवा इतर तत्सम नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी बांधवांच्या पिकांचे नुकसान होत असते. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना सदर झालेल्या नुकसानीची भरपाई दिली जावी या अनुषंगाने पिक विमा योजना सुरू करण्यात आली आहे.
सदर पिक विमा योजना केंद्र पुरस्कृत असून प्रधानमंत्री पिक विमा योजना असे या योजनेचे नाव आहे. पिक विमा योजनेअंतर्गत शेतकरी बांधवांना पिकांचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई दिली जाते. या अनुषंगाने शेतकरी बांधवांना पिक विमा काढावा लागतो. मित्रांनो आज आपण ज्या शेतकरी बांधवांनी पीक विमा काढलेला असेल आणि नैसर्गिक आपत्तीमुळे त्यांचे नुकसान झाले असेल तर कशा पद्धतीने पिक विमा साठी दावा केला जातो याविषयी जाणून घेणार आहोत.
मित्रांनो खरं पाहता नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास पिक विमा योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी सदर पिक विमा धारक शेतकरी बांधवांना 72 तासांच्या आत पीक विमा साठी क्लेम करावा लागतो. आज आपण अँड्रॉइड मोबाईलच्या माध्यमातून कशा पद्धतीने पिक विमासाठी क्लेम केला जाऊ शकतो याविषयी जाणून घेणार आहोत.
पिक विमा साठी क्लेम करण्याची प्रोसेस
पिक विम्याचा क्लेम करण्यासाठी संबंधित शेतकरी बांधवांनी सर्वप्रथम आपल्या अँड्रॉइड मोबाईलवर क्रॉप इन्शुरन्स नामक अँप्लिकेशन डाऊनलोड करून घ्यावे. हे ॲप्लिकेशन प्ले स्टोअरवर निशुल्क उपलब्ध आहे.
एप्लीकेशन डाउनलोड झाल्यानंतर हे एप्लीकेशन ओपन करा.
एप्लीकेशन ओपन झाल्यानंतर continue without login या पर्यायावर क्लिक करा.
नंतर crop loss या पर्यायावर क्लिक करा.
नंतर crop loss intimation या पर्यायावर शेतकऱ्यांना क्लिक करावे लागणार आहे.
त्यानंतर शेतकरी बांधवांना आपला मोबाईल नंबर प्रविष्ट करावा लागणार आहे. मोबाईल नंबर प्रविष्ट केल्यानंतर send otp या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर जो मोबाईल नंबर तुम्ही प्रविष्ट केला असेल त्यावर एक ओटीपी येईल. तो ओटीपी तिथे टाकायचा आहे.
त्यानंतर तुमच्यापुढे एक नवीन पेज ओपन होईल. त्या ठिकाणी पिक विमा संदर्भात डिटेल्स शेतकऱ्यांना भरावे लागतील. जसे की शेतकरी बांधवानी कोणत्या हंगामातील पिक विमा काढला आहे याची डिटेल्स म्हणजे खरीप किंवा रब्बी हा पर्याय निवडावा लागणार आहे. यानंतर पिक विम्याचे वर्ष सिलेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर योजनेचे नाव प्रधानमंत्री फसल बीमा योजना सिलेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर संबंधित शेतकरी बांधवांना राज्य निवडावे लागणार आहे. एवढे केल्यानंतर सिलेक्ट या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
त्यानंतर एक नवीन पेज ओपन होईल. या ठिकाणी शेतकरी बांधवांनी ज्या ठिकाणी अर्ज भरला असेल ते ठिकाण नमूद करायचे आहे. बहुदा शेतकरी बांधव सीएससी सेंटर वर अर्ज भरतात. अशा परिस्थितीत त्या ठिकाणी सीएससी सेंटर निवडावे लागणार आहे. त्यानंतर Do You Have A Policy Number या पर्यायावर क्लिक करा. या ठिकाणी ज्यावेळी शेतकरी बांधवांनी पीक विम्याचा अर्ज केलेला असतो त्यावेळी त्यांना दिला गेलेला पॉलिसी नंबर प्रविष्ट करावा लागतो. पॉलिसी नंबर प्रविष्ट केल्यानंतर done या पर्यायावर क्लिक करा.
त्यानंतर पॉलिसी नंबर यावर टच करायचे आहे. त्यानंतर सदर शेतकरी बांधवांचे सर्व डिटेल ओपन होणार आहे. त्या ठिकाणी शेतकरी बांधवांना ज्या पिकाचे नुकसान झाले आहे ते पीक सिलेक्ट करायचे आहे.
यानंतर Allow crop insurance to access this device location अशी एक पॉप अप विंडो ओपन होईल. त्या ठिकाणी while using the app यावर क्लिक करावे लागणार आहे.
आता शेतकरी बांधवांपुढे report incidence अस एक नवीन पेज ओपन होईल. त्या ठिकाणी type of incidence या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे. या ठिकाणी पिकाचे कशामुळे नुकसान झाले आहे त्यावर क्लिक करावे लागणार आहे. त्यानंतर नुकसान झाल्याची दिनांक सिलेक्ट करावे लागणार आहे. त्याखाली Status of crop at the time of incidence या ठिकाणी नुकसानीचे घटना झाली त्यावेळी पीक कोणत्या परिस्थितीत होते हे सिलेक्ट करावे लागणार आहे. त्यानंतर expected loss in percentage या पर्यायात पिकाचे अंदाजे किती नुकसान झाले आहे हे प्रविष्ट करावे लागणार आहे. त्यानंतर पीक विम्याचा क्लेम हा यशस्वीरित्या पूर्ण होणार आहे.
त्यानंतर संबंधीत शेतकरी बांधवांना docket id मिळणार आहे. या आयडी च्या माध्यमातून शेतकरी बांधवांना आपल्या पिक विम्याची स्थिती जाणून घेता येणार आहे. यामुळे हा आयडी सांभाळून ठेवावा. पिक विमा क्लेम केल्यानंतर संबंधित विमा कंपनीचे अधिकारी पिक विम्याची पाहणी करण्यासाठी घटनास्थळी दाखल होतील. त्यानंतर अधिकारी पिकाचे किती नुकसान झाले आहे. याबाबत सविस्तर पिक विमा कंपनीकडे माहिती अपडेट करतील. त्यानंतर पिक विमा नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना दिली जाते.