Soybean Market : येत्या दोन दिवसात ऑक्टोबर महिन्याला सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर मध्ये पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीन काढणीसाठी तयार होणार आहे. अर्थातच येत्या काही दिवसात सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. साधारणता विजयादशमीच्या मुहूर्तावर नवीन सोयाबीन बाजारात दाखल होऊ शकतो असे सांगितले जात आहे.
अशातच देशभरातील सोयाबीन उत्पादकांसाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर सोयाबीन हे एक प्रमुख तेलबिया पीक असून याला नगदी पिकाचा दर्जा प्राप्त आहे. नगदी पीक असल्याने याची आपल्या राज्यात मोठ्या प्रमाणात शेती होते. राज्यातील हवामान सोयाबीन पिकासाठी खूपच मानवते.
हेच कारण आहे की राज्यातील विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांशी जिल्ह्यांमध्ये या पिकाची लागवड केली जाते. सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र आपल्या राज्यात खूपच उल्लेखनीय आहे. उत्पादनाचा विचार केला असता महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर येते. अर्थातच राज्यात या पिकाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.
मात्र गेल्या वर्षी सोयाबीन राज्यातील शेतकऱ्यांना फारसे फायदेशीर ठरले नाही. याचे मुख्य कारण म्हणजे गेल्या हंगामात बाजारात सोयाबीन अपेक्षित असा भाव मिळत नव्हता. गेल्या हंगामात हमीभावापेक्षा अधिकचा भाव मिळाला मात्र शेतकऱ्यांना सोयाबीन पीक उत्पादित करण्यासाठी खूप खर्च करावा लागला होता. त्यामुळे गेल्या हंगामातील भाव शेतकऱ्यांना परवडला नाही. यंदा मात्र हे पिक फायदेशीर ठरू शकते. कारण की यावर्षी सोयाबीनला चांगला भाव मिळण्याची शक्यता आहे.
सोयाबीन बाजारात तेजी राहण्याची कारणे?
सोयाबीन हे भारत, अमेरिका आणि ब्राझील यांसारख्या देशात उत्पादित होणारे एक मुख्य पीक आहे. यंदा मात्र भारतासमवेतच अमेरिका आणि ब्राझीलमध्ये सोयाबीनचे उत्पादन कमी राहणार असा दावा केला जात आहे. यंदा भारतात कमी पाऊस पडला असल्याने सोयाबीनचे उत्पादन कमी होणार आहे. प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्य जसे की मध्य प्रदेश महाराष्ट्र राजस्थान या राज्यांमध्ये यंदा खूपच कमी पाऊस पडला आहे आणि हेच कारण आहे की यंदा सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
ब्राझील आणि अमेरिका मध्ये देखील अशीच परिस्थिती आहे. त्यामुळे जागतिक पातळीवर मागणीच्या तुलनेत यंदा पुरवठा कमी राहणार असे सांगितले जात आहे. येत्या 25 ते 30 दिवसात सोयाबीनचा नवीन हंगाम सुरू होणार आहे. सध्या सोयाबीनला 5000 ते साडेपाच हजाराचा भाव मिळत आहे. पण जागतिक पातळीवर उत्पादन कमी होणार असल्याने अमेरिकेत सोयाबीनचे भाव वाढू लागले आहेत.
यासोबतच पामतेल सूर्यफुलाच्या तेलात वाढ होत आहे. त्यामुळे सोया तेलाच्या दरातही वाढवण्याची शक्यता आहे. सोया तेलाचे बाजार भाव वाढलेत म्हणजे याचा परिणाम थेट सोयाबीनच्या दरावर होणार आहे. सोयाबीनचे दर देखील वाढणार आहेत. शिवाय वायद्यांमध्ये सोयाबीन आणि सोया पेंड तेजीत आहेत. एकंदरीत या सर्व बाबींचा विचार केला तर नवीन हंगामात सोयाबीनच्या दरात तेजी येऊ शकते असा असा आशावाद व्यक्त होऊ लागला आहे.
म्हणजे यंदा सोयाबीनचे बाजार तेजीत राहण्याची शक्यता आहे. मात्र आताच उत्पादनाच्या बाबतीत अंदाज बांधणे थोडेसे घाईचे होणार आहे. परंतु पावसाची विपरीत परिस्थिती पाहता उत्पादनात घट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे जर उत्पादनात घट आली तर दरात वाढ होऊ शकते.