Soybean Market Rate : राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे गेल्या अनेक महिन्यांपासून दबावात असलेले सोयाबीन बाजारभाव थोडेशे सुधारले आहेत. राज्यातील उत्तर महाराष्ट्र विभागातील एका महत्त्वाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला चांगला विक्रमी भाव मिळाला आहे.
यामुळे सदर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये थोडेसे समाधानकारक चित्र पाहायला मिळाले आहे. Soyabean हे राज्यातील मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात उत्पादित केले जाणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. राज्यात या पिकाची खरीप हंगामातच लागवड केली जाते.
खरीपातील हे एक महत्त्वाचे पीक आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी सोयाबीनला बाजारात चांगला भाव मिळाला होता. सोयाबीन त्यावेळी 7-8 हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास विकले जात होते. त्यावर्षी कित्येकदा यापेक्षाही अधिक भाव मिळाला होता. मात्र गेल्या हंगामात सोयाबीनचे बाजार भाव दबावात होते.
यामुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कापसाचे आणि सोयाबीनचे भाव गेल्यावर्षी दबावत असल्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे देखील मोठे नुकसान झाले. किमान यंदा तरी चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.
मात्र हंगाम सुरू झाल्यापासून अर्थातच विजयादशमीपासून पिवळं सोन म्हणून ओळखल जाणार सोयाबीन दबावात आहे. राज्यातील कित्येक बाजारांमध्ये सोयाबीनला हमीभावापेक्षा कमी दर मिळत आहे. गेल्या वर्षी अर्थातच 2022-23 या हंगामात सोयाबीनसाठी चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव निश्चित करण्यात आला होता.
यंदा अर्थातच 2023-24 या हंगामात सोयाबीनला 4,600 रुपये प्रति क्विंटल एवढा हमीभाव केंद्र शासनाच्या माध्यमातून ठरवून देण्यात आला आहे. अर्थातच गेल्यावर्षीपेक्षा यंदा फक्त 300 रुपये अधिक भाव देण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्यातील कित्येक बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सोयाबीनचे भाव याहीपेक्षा कमी नमूद करण्यात आले आहेत.
सोयाबीनचा दर्जा कमी झाला असल्याचे कारण पुढे करत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची एका प्रकारे लुबाडणूक सुरू आहे. याला शासनाचे उदासीन धोरण देखील कारणीभूत आहे. खाद्यतेल आयातीसाठी शासनाने पूरक धोरण निर्माण केले असल्याने याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य मतदारराजा खुश राहावा यासाठी शासनाकडून खाद्यतेलाचे दर नियंत्रणात ठेवले जात आहेत. याचा परिणाम म्हणून देशात मोठ्या प्रमाणात खाद्यतेलाची आयात झाली असून हेच कारण आहे की सोयाबीनला अपेक्षित असा उठाव मिळत नाहीये.
यामुळे सोयाबीनचे भाव 5000 पेक्षा कमी आहेत. अनेक ठिकाणी हमीभावाच्या पातळीवर सोयाबीनचे भाव पाहायला मिळत आहेत. अशातच मात्र काल राज्यातील उत्तर महाराष्ट्रातील एका महत्त्वाच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनचे भाव 6000 रुपये प्रति क्विंटल पर्यंत पोहोचलेत.
मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये काल अर्थातच तेरा फेब्रुवारी 2023 रोजी चोपडा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला किमान 3500 रुपये प्रति क्विंटल, कमाल 6000 रुपये प्रति क्विंटल आणि सरासरी 4201 रुपये प्रति क्विंटल एवढा विक्रमी भाव मिळाला आहे.