Soybean Market Price : दरवर्षीप्रमाणे याही वर्षी महाराष्ट्रातील मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी सोयाबीनची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. सोयाबीन हे राज्यातील एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची राज्यभर शेती केली जाते. याची लागवड उत्तर महाराष्ट्रात देखील उल्लेखनीय आहे.
मात्र गेल्या दोन वर्षांपासून सोयाबीनचे दर बाजारात दबावात आहेत. गेल्या खरीप हंगामात म्हणजेच 2023 च्या खरीप हंगामात कमी पाऊस झालेला असतानाही शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड केली होती. मात्र कमी पाऊस असतानाही आणि उत्पादनात थोडीशी घट झालेली असतानाही सोयाबीनला बाजारात अपेक्षित दर मिळाला नाही.
यामुळे भाववाढीच्या आशेने अनेक शेतकऱ्यांनी आत्तापर्यंत सोयाबीन आपल्या घरांमध्ये राखून ठेवला आहे. आता मात्र 2024 चा खरीप हंगाम सुरू झाला असून यंदाही मोठ्या प्रमाणात सोयाबीनची लागवड झाली आहे. यामुळे अनेकजणांनी आता सोयाबीन विक्रीचा निर्णय घेतला आहे.
यानुसार बाजारांमध्ये सोयाबीनची टप्प्याटप्प्याने आवक होत आहे. दरम्यान अनेकांच्या माध्यमातून सध्या सोयाबीनला काय भाव मिळतोय असा प्रश्न उपस्थित केला जात होता. यामुळे आज आपण राज्यातील प्रमुख बाजारांमध्ये सोयाबीनला काय भाव मिळतोय याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
कोणत्या बाजारात मिळाला सर्वाधिक दर?
अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्ये आज सोयाबीनला सर्वाधिक दर मिळाला आहे. महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न महामंडळाचा अधिकृत संकेतस्थळावरून प्राप्त झालेल्या माहितीनुसार या मार्केटमध्ये आज सोयाबीन किमान 3900, कमाल 4530 आणि सरासरी 4372 या दराने विकले गेले आहे.
बार्शी कृषी उत्पन्न बाजार समिती : बार्शीच्या मार्केटमध्येही आज सोयाबीनला चांगला भाव मिळाला आहे. येथे आज सोयाबीनला कमाल 4500, किमान 4,375 आणि सरासरी 4400 असा दर मिळाला आहे.
हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती : या मार्केटमध्येही आज सोयाबीनला कमाल 4500, किमान 2600 आणि सरासरी 3600 असा भाव मिळाला आहे.
देवणी कृषी उत्पन्न बाजार समिती : देवणी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आज पिवळ्या सोयाबीनला किमान चार हजार 490, कमाल 4490 आणि सरासरी 4490 असा भाव मिळाला आहे.
उमरेड कृषी उत्पन्न बाजार समिती : या बाजारात आज पिवळे सोयाबीन किमान चार हजार, कमाल 4480 आणि सरासरी 4250 या दरात विकले गेले आहे.
हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती : हिंगोली एपीएमसी मध्ये आज लोकल सोयाबीन किमान 4005, कमाल 4450 आणि सरासरी 4227 या बाजारभावात विकले गेले आहे.