Soybean Market Price : सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना गेल्या अनेक दिवसांपासून आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. गेल्या हंगामात सोयाबीन उच्चांकी दरात विक्री झाला यामुळे याही हंगामात चांगला दर मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना होती. जाणकार लोक देखील या हंगामात सोयाबीनला 6,000 ते साडेसहा हजार रुपये प्रति क्विंटल एवढा दर मिळू शकतो असा अंदाज बांधत होते. मध्यंतरी जाणकार लोकांचा हा अंदाज प्रत्यक्षात खरा उतरला होता.
सोयाबीन साडेसहा हजार रुपये प्रतिक्विंटल पेक्षा अधिक दरात विक्री होत होता. मात्र गेल्या एक ते दीड महिन्यांपासून सोयाबीन दरात मंदी आली आहे. सोयाबीन 5000 रुपये ते पाच हजार दोनशे रुपये प्रतिक्विंटल दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून विक्री होत आहे. आज मात्र वडूज एपीएमसी मध्ये सोयाबीन साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटल एवढ्या कमाल दरात विक्री झाला आहे. यामुळे दरवाढ होईल का हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे. तज्ञ लोकांच्या मते या हंगामात सोयाबीन साडेपाच हजार रुपये ते 6000 रुपये प्रति क्विंटल दरम्यान विक्री होऊ शकतो.
मात्र वडूज एपीएमसी वगळता राज्यातील इतर बाजारात आजही सोयाबीन 5 हजार 200 रुपये प्रतिक्विंटलचे आसपासच स्थिरावलेला पाहायला मिळाला. अनेक बाजारात सोयाबीनचे सरासरी बाजार भाव याहीपेक्षा कमी होते. यामुळे सोयाबीन उत्पादकांची आर्थिक कोंडी होत आहे. दरम्यान आज आपण राज्यातील प्रमुख बाजारात सोयाबीनला काय भाव मिळाला आहे याविषयी थोडक्यात जाणून घेणार आहोत.
आजचे राज्यातील सोयाबीन बाजार भाव जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Soybean Market Price : सोयाबीन दरात वाढ; ‘या’ ठिकाणी मिळाला सर्वाधिक दर