Soybean Harvesting Machine : शेतकरी बांधव खरीप हंगामात भात, सोयाबीन, कापूस, उडीद, मूग अशा विविध पिकांची लागवड करत असतात. यातील सोयाबीन पिकाबाबत बोलायचं झालं तर हे राज्यातील विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे तेलबिया पीक आहे. या तेलबिया पिकाला पिवळं सोनं म्हणून ओळखल जात. या पिकाला नगदी पिकाचाही दर्जा देण्यात आला आहे.
या पिकाची दरवर्षी महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात लागवड होते. यंदाही सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात खूपच उल्लेखनीय आहे. येत्या काही दिवसांनी या पिकाची प्रत्यक्षात हार्वेस्टिंग होणार आहे.
पुढील महिन्यापासून सोयाबीनचा नवीन माल बाजारात येणार आहे. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून सोयाबीन पिकाची प्रत्यक्षात हार्वेस्टिंग सुरू होणार आहे. मात्र सोयाबीन हार्वेस्टिंग अलीकडे खूपच महाग झाले आहे.
विशेष म्हणजे हार्वेस्टिंग करताना सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानही होते. या पिकाची हार्वेस्टिंग करताना शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा खर्च होत असतो. महत्त्वाचे म्हणजे वेळेवर मजूर मिळत नाही आणि यामुळे पिकाची नासधूस होते.
मात्र शेतकऱ्यांच्या या सर्व समस्येवर एक रामबाण उपाय आहे. तो उपाय म्हणजे सोयाबीन पिकाची हार्वेस्टिंग ही रीपर बाइंडर या यंत्राच्या साह्याने केली जाऊ शकते. या मशीनच्या मदतीने जर सोयाबीनची हार्वेस्टिंग केली तर शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा वाचतो.
हे मशीन सोयाबीनची फक्त काढणी करत नाही तर सोयाबीनचे पीक बांधून देते. मात्र या मशीनचे दोन प्रकार असतात. एक मशीन स्व-चालित असते आणि एक ट्रॅक्टरने चालवले जाते. मशीन मध्ये पाच गिअर्स असतात.
पिकाची काढणी करण्यासोबतच पीक बांधले देखील जाते यामुळे पिकाचे नुकसान कमी होते. हे यंत्र एक लिटर डिझेलवर एक तास चालते हे विशेष. या यंत्रामुळे एक एकर पीक एका तासात काढले जाऊ शकते. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च कमी होतो.
मशीनची किंमत किती आहे?
ट्रॅक्टरद्वारे चालवल्या जाणाऱ्या रीपर बाइंडरची किंमत ही थोडी अधिक आहे, याची किंमत ही 3,40,000 रुपयांपर्यंत असू शकते. स्वयंचलित मशीनची किंमत ही ट्रॅक्टर द्वारे चालवल्या जाणाऱ्या मशीन पेक्षा कमी आहे. यां मशीन ची किंमत ही अंदाजे 1,10,000 च्या आसपास असते.
महत्त्वाचे म्हणजे काही राज्य सरकारकडून या मशीनवर अनुदानही दिले जाते. यांत्रिकीकरणाला चालना मिळावी अनुषंगाने शासन या मशीन साठी अनुदान देते. त्यामुळे या अनुदानाचा लाभ घेऊन शेतकऱ्यांना अगदीच कमी खर्चात हे मशीन आपले बनवता येते.