Soybean Farming : सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक कामाची अपडेट समोर येत आहे. पंजाबराव डख यांनी एक अतिशय महत्त्वाचा आणि मोलाचा सल्ला दिला आहे. डख यांनी शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करताना कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे जेणेकरून त्यांना चांगले उत्पादन मिळवता येईल, याबाबत महत्वाची माहिती दिली आहे.
सोयाबीनला शेतकरी बांधव पिवळे सोने म्हणून ओळखतात. या पिकाची संपूर्ण राज्यभर शेती केली जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ या विभागात सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र सर्वाधिक आहे.
याशिवाय उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन लागवड होते. एकंदरीत या नगदी पिकावर राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
याची लागवड ही प्रामुख्याने खरीप हंगामात केली जाते. काही शेतकरी बांधव उन्हाळ्यात याची लागवड करतात. मात्र उन्हाळ्यात सोयाबीनची पेरणी फक्त बीजोत्पादनासाठी केली जाते.
दरम्यान, आज आपण खरीप हंगामात सोयाबीन पेरणी करताना शेतकऱ्यांनी कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबाबत पंजाबराव यांनी दिलेला महत्त्वाचा सल्ला जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
पंजाब रावांचा सल्ला काय
पंजाब रावांनी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना जून महिन्यात पेरणी करताना उशिरा हार्वेस्टिंगसाठी तयार होणाऱ्या जातींची पेरणी करण्याचा सल्ला दिला आहे.
दुसरीकडे जर जुलै महिन्यात शेतकरी पेरणी करत असतील तर त्यांनी लवकर हार्वेस्टिंग साठी तयार होणाऱ्या वाणाची निवड केली पाहिजे असे मत पंजाब रावांनी व्यक्त केले आहे.
असे केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळणार आहे कारण की यामुळे शेतकऱ्यांचे पीक अतिवृष्टी पासून वाचू शकते.
ते म्हणतात की आपल्याकडे जेव्हा सोयाबीनचे पीक हार्वेस्टिंगसाठी येते तेव्हाच नेमकी अतिवृष्टी होते आणि यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसत असतो.
हेच कारण आहे की, पंजाबरावांनी जून महिन्यात सोयाबीन पेरणीसाठी उशिरा तयार होणाऱ्या जातींची आणि जुलै महिन्यात सोयाबीन पेरणीसाठी लवकर तयार होणाऱ्या जातींची लागवड करण्याचा सल्ला दिला आहे.