Soybean Farming Tips : सोयाबीन (Soybean Crop) हे एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) असून याची खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यात सोयाबीन लागवडीखालील (Soybean Farming) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव (Farmer) सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून असल्याचे चित्र आहे. सोयाबीन पिकातून चांगली कमाई (Farmer Imcome) करण्यासाठी सोयाबीन पिकाचे योग्य पद्धतीने व्यवस्थापन (Soybean Crop Management) करणे अतिशय महत्त्वाचे ठरते.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सध्या राज्यात अनेक ठिकाणी सोयाबीन पीक फळधारणा होण्याच्या अवस्थेत आहे म्हणजे शेंगा लागायला नुकतीच सुरुवात झाली आहे. तर काही ठिकाणी सोयाबीन पिकाच्या शेंगा भरायला सुरुवात झाली आहे.
मात्र असे असताना सोयाबीन पिकावर काही कीटकांचा प्रादुर्भाव (Soybean Pest Management) देखील बघायला मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादनात देखील घट होऊ शकते. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावर सद्यस्थितीला कीटकांचा प्रादुर्भाव असेल तर शेतकरी बांधवांना लगेचचं त्यावर नियंत्रण मिळवावे लागणार आहे.
सोयाबीन पिका मध्ये सध्या चक्री भुंगा, खोडमाशी या खोडकिडींचा तसेच उंटअळी, शेंगा पोखरणारी अळी आणि तंबाखूवरील पाने खाणारी अळी या पतंग वर्गीय कीटकांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. याशिवाय केसाळ अळीचा देखील अनेक ठिकाणी सोयाबीन पिकांमध्ये प्रादुर्भाव बघायला मिळाला आहे.
सध्या सोयाबीन पीक फळधारणा तसेच शेंगा भरण्याच्या अवस्थेत असल्यामुळे या कीटकांवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे आज आपण या कीटकांवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ येथील कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्राने या किटकांवर कशा पद्धतीने नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी महत्त्वाचा सल्ला जारी केला आहे.
कीडींचे रासायनिक नियंत्रण कसं कराल जाणून घ्या
क्लोरअॅट्रानिलीप्रोल (१८.५ %) 30 मिली किंवा
पूर्वमिश्रित कीडनाशक थायामिथोक्झाम (१२.६%) + लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन (९.५ %) 25 मिली किंवा
पूर्वमिश्रित कीडनाशक क्लोरअॅन्ट्रानिलीप्रोल (९.३ %) + लॅम्ब्डासायहॅलोथ्रिन (४.६ %) 40 मिली किंवा
टेट्रानिलीप्रोल (१८.१८% ) 50 ते 60 मिली किंवा
पूर्वमिश्रित कीडनाशक बिटा सायफ्ल्युथ्रीन (८.४९ %) + इमिडाक्लोप्रीड (१९.८१ %) 70 मिली
मित्रांनो वर नमूद केलेल्या कोणत्याही कीटकांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी वरीलपैकी कोणत्याही एका किटकनाशकाचे 100 लिटर पाण्यात फवारणी करावी लागणार आहे. वर दिलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण हे 100 लिटर पाण्यासाठी आहे शेतकरी बांधव त्यांच्या आवश्यकतेनुसार पाण्याच्या प्रमाणानुसार कीटकनाशकांचे प्रमाण घेऊ शकतात.