Soybean Farming : सोयाबीन हे मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पादित होणारे एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाला नगदी पिकाचा अर्थातच कॅश क्रॉप म्हणून दर्जा दिला गेला आहे. याचे कारण म्हणजे याच्या विक्रीतून शेतकऱ्यांना ताबडतोब कॅश मिळते. मात्र, हे नगदी पीक अलीकडे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढवत आहे.
याचे कारण म्हणजे दिवसेंदिवस सोयाबीन पिकावर रोगराईचे प्रमाण वाढत आहे. वेगवेगळ्या कीटकांचा हल्ला सोयाबीन पिकावर होत असून यामुळे सोयाबीन उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट येऊ लागली आहे. शिवाय, उत्पादन खर्चात मोठी वाढ होत आहे.
रोगांचा आणि कीटकांचा प्रादुर्भाव कमी व्हावा यासाठी शेतकऱ्यांना आता अधिकच्या फवारण्या कराव्या लागत आहेत. अशा परिस्थितीत, सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे उत्पन्न कमी होऊ लागले आहे. यामुळे भारतीय शास्त्रज्ञांच्या माध्यमातून सोयाबीनच्या वेगवेगळ्या जाती शोधल्या जात आहेत.
दरम्यान, आज आपण सोयाबीनची अशीच एक नव्याने विकसित झालेली प्रमुख जात जाणून घेणार आहोत ज्याची पेरणी केल्यास शेतकऱ्यांना चांगले उत्पादन या ठिकाणी मिळू शकणार आहे. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया या नव्याने विकसित झालेल्या जाती विषयी सविस्तर माहिती.
कोणती आहे ही नवीन जात ?
ICAR-भारतीय सोयाबीन संशोधन संस्था, इंदूर (मध्य प्रदेश) द्वारे नवीन जात विकसित करण्यात आली आहे. सोयाबीनची NRC 150 हा वाण अलीकडेच विकसित झाला असून यातून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळत आहे.
विशेष म्हणजे या जातीची शिफारस मराठवाडा आणि विदर्भासाठी करण्यात आली आहे. सोयाबीनच्या या जातीची शिफारस मध्य प्रदेश, उत्तर प्रदेशातील बुदेलखंड प्रदेश, राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रातील विदर्भ आणि मराठवाडा विभागासाठी करण्यात आली असल्याची माहिती कृषी तज्ञांनी दिली आहे.
कृषी शास्त्रज्ञांनी विकसित केलेली सोयाबीनची NRC 150 जात दुर्गंधीमुक्त आहे. त्यामुळे प्रक्रिया उद्योगात या जातीचे सोयाबीन मागणीमध्ये राहील आणि शेतकऱ्यांना चांगला भाव मिळणार आहे. म्हणजेच, सोयाबीनच्या या जातीपासून बनवलेल्या उत्पादनांना जसे की सोया मिल्क, सोया चीज, सोया टोफू इत्यादींना हा वास येणार नाही.
IISR मधील कृषी शास्त्रज्ञांच्या मते, सोयाबीनची ‘NRC 150’ ही जात प्रथिने आणि इतर पोषक तत्वांनी समृद्ध आहे आणि कुपोषण दूर करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात आली आहे.
सोयाबीनच्या या जातीपासून बनवलेल्या खाद्यपदार्थांचा वापर नकोसा दुर्गंधीमुक्त असल्याने सर्वसामान्यांमध्ये याचा वापर वाढेल, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला आहे.सोयाबीनचा हा वाण 91 दिवसात काढणीसाठी तयार होणार आहे.
91 दिवसात परिपक्व होणारा हा वाण हेक्टरी 35 ते 38 क्विंटल एवढ दर्जेदार उत्पादन देण्यास सक्षम असल्याचा दावा कृषी तज्ञांनी केला आहे. या जातीचे बियाणे पेरणी करताना हेक्टरी 70 किलो पर्यंत बियाणे वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.