Soybean Farming: भारतात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर आहे. खरीप हंगामात भारतात सर्वत्र सोयाबीन या मुख्य पिकाची (Soybean crop) शेती बघायला मिळते. सोयाबीनची शेती (soybean cultivation) भारतात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सर्वाधिक बघायला मिळते.
सोयाबिनच्या उत्पादनात (soybean production) मध्य प्रदेश हा शीर्षस्थानी विराजमान असून महाराष्ट्र हा दुसऱ्या क्रमांकावर आहे. निश्चितच महाराष्ट्रात सोयाबीन हे एक मुख्य पीक आहे. राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (cash crop) अवलंबून आहे. खरं पाहता सोयाबीन हे शेतकरी बांधवांना शाश्वत उत्पादन मिळवून देण्यात सक्षम आहे.
मात्र असे असले तरी हवामानात होत असलेल्या बदलांमुळे सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या घटकांचे आणि रोगांचे सावट बघायला मिळते. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट होते. यामुळे सोयाबीन पिकावरील कीटकांचे (soybean disease) तसेच रोगांचे वेळीच व्यवस्थापन करणे अतिशय आवश्यक आहे. सोयाबीन पिकावर तंबाखू सुरवंट प्रामुख्याने नजरेस पडत असतात.
हे कीटक सोयाबीन पिकासाठी घातक असून यामुळे उत्पादनात मोठी घट होत असल्याचे जाणकार नमूद करतात. अशा परिस्थितीत या किटकांवर नियंत्रण मिळविण्यासाठी वेळेवर उपाययोजना केल्या गेल्या पाहिजेत. आज आपण आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी वाचक मित्रांसाठी या हानिकारक कीटकांवर कशा पद्धतीने नियंत्रण (pest control) मिळवले जाऊ शकते याविषयी बहुमूल्य माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.
तंबाखू सुरवंट नियंत्रण पद्धती (Spodoptera litura)
- नियंत्रणासाठी, प्रादुर्भावग्रस्त झाडांमधील पॅनिकल आणि अळ्यांची गुच्छ असलेली पाने गोळा करून नष्ट करा.
- जेव्हा आपण शेताची पाहणी करतो तेव्हा कागदासारखी किंवा जाळीदार पाने दिसताच पानांच्या खाली लोब्यूल्स किंवा अळ्यांचे पुंजके दिसतील, अशी पाने किंवा संपूर्ण झाड हळूहळू गोळा करा आणि गोणीत टाका आणि शेवटी शेतातून बाहेर काढा, आणि शेतापासून दुरवर नष्ट करा.
- ज्या ठिकाणी अशी पाने आढळतात त्या ठिकाणी लगेच कीटकनाशकाची फवारणी करावी.
- जाणकार लोकांच्या मते सोयाबीन पिकाच्या आजूबाजूला शेतात सूर्यफूल आणि एरंडीसारखी झाडे लावली तर तंबाखू सुरवंट या किडीचा प्रादुर्भाव कमी केला जाऊ शकतो.
- तसेच, शेतकरी बांधवांनी कीटकांना आकर्षित करण्यासाठी दिवे किंवा फेरोमोन सापळे वापरा.
- याशिवाय जाणकार लोक सांगतात की, सोयाबीन पिकातील तणांचे नियंत्रण करणे अतिशय महत्त्वाचे आहे. नियंत्रण केल्यास अनेक प्रकारची रोगराईला प्रतिबंधित करता येते.
- याशिवाय जर सोयाबीन पिकात तंबाखू अळीचा प्रादुर्भाव दिसून आला तर रासायनिक फवारणी करून देखील यावर नियंत्रण मिळवले जाऊ शकते. मात्र रासायनिक फवारणी जेव्हा परिस्थिती आटोक्यात नसेल तेव्हाच करावी. रासायनिक नियंत्रणासाठी शेतकरी बांधव 180 मिली स्पिनेटरम 11.7 sc फवारणी करू शकतात. बाजारात डेलीगेट, लार्गो, समिट इत्यादी नावाने हे औषध उपलब्ध आहे.
- शेतकरी बांधवांना वर नमूद केलेली फवारणी भेटली नाही तर शेतकरी बांधव फ्लुबेन्डियामाइड 39.35% प्रति एकर जमिनीवर 60-70 मिली पाण्यात मिसळून फवारणी करू शकतात. फेम, ओरिझॉन इत्यादी नावाने हे औषध बाजारात उपलब्ध आहे.
- याशिवाय, सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव 300 ग्रॅम थायोडीकार्ब 75% डब्ल्यूपी (ब्रँड नेम- लेर्विन किंवा केमविन) देखील फवारणी करू शकतात.
- फवारणी करून देखील कीटकाचे नियंत्रण होत नसेल तर कार लोकांच्या सल्ल्याने 10 दिवसांच्या अंतराने पुन्हा फवारणी करावी.
- मित्रांनो कोणत्याही पिकावर आणि कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही.