Soybean Farming : भारतात गेल्या अनेक शतकांपासून मोठ्या प्रमाणात तेलबिया पिकांची (Oilseed Crop) लागवड केली जात आहे. सोयाबीन (Soybean Crop) हे देखील एक प्रमुख तेलबिया पीक आहे. या पिकाची संपूर्ण भारत वर्षात मोठ्या प्रमाणात शेती (Farming) केली जाते.
भारतातील एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. रिपोर्ट नुसार, सोयाबीन उत्पादनात मध्यप्रदेश हे प्रथम क्रमांकाचे राज्य असून त्यापाठोपाठ महाराष्ट्राचा नंबर लागतो. निश्चितच महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून आहे.
राज्यातील मराठवाडा विदर्भ तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची शेती केली जाते. सध्या सोयाबीन पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे. या अवस्थेत सोयाबीन पिकाची काळजी घेणे अतिशय आवश्यक ठरते.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की सोयाबीन पिकात खोड कीड, पाने खाणारी अळी आणि चक्रीभुंग्याचा मोठा प्रादुर्भाव कायमच बघायला मिळतो. अशा परिस्थितीत या तीन भयंकर कीटकांचे वेळीच नियंत्रण करणे अतिशय आवश्यक ठरते नाही तर उत्पादनात भलीमोठी घट होण्याचा धोका असतो.
जाणकार लोकांच्या मते, शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकात रोगराईचे तसेच कीटकांचा (Soybean Pest) प्रादुर्भाव टाळण्यासाठी कायमच सोयाबीनच्या प्रगत आणि सुधारित जातींची पेरणी करणे अतिशय आवश्यक ठरते. तसेच सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी सोयाबीन पेरणी करताना सोयाबीनच्या बियाण्यावर बिजोपचार अर्थात बीजप्रक्रिया करणे अतिशय आवश्यक ठरते.
मित्रांनो आज आपण पाने खाणारी अळी, चक्री भुंगा आणि खोडकीड या तीन कीटकांचे एकात्मिक व्यवस्थापन (Soybean Pest Management) कशा पद्धतीने केले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या महत्वपूर्ण माहिती विषयी सविस्तर.
स्टेम बोरर किंवा खोडकीड, गर्डल बीटल आणि पाने खाणाऱ्या सुरवंटावर खालीलप्रमाणे नियंत्रण मिळवा
सोयाबीन पिकातील स्टेम बोरर किंवा खोडकीड, गर्डल बीटल आणि पाने खाणाऱ्या सुरवंटाच्या एकाच वेळी नियंत्रणासाठी, पूर्व-मिश्रित कीटकनाशके क्लोरेनटेनिली प्रोल 09.30% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 04.60% ZC (200 मिली/हेक्टर) किंवा बीटासिफ्लुथ्रीन + 3 मिली + इमडाक्लोड्रिन + 3 मिली. पूर्व-मिश्रित थायोमेथोक्सॅम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (125 मिली/हेक्टर). या प्रमाणात फवारणी करावी.
मित्रांनो कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या आधी शेतकरी बांधवांनी तज्ञ लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही स्वरूपात अंतिम राहणार नाही याची नोंद घ्यावी.