Soybean Farming : संपूर्ण भारतवर्षात सध्या खरीप हंगाम (Kharif Season) प्रगतीपथावर आहे. या हंगामात आपल्या देशातील शेतकरी बांधव (Farmer) मोठ्या प्रमाणात सोयाबीन (Soybean Crop) या तेलबिया पिकाची (Oilseed Crop) लागवड करत असतात. आपल्या राज्यात देखील सोयाबीनची शेती विशेष उल्लेखनीय आहे. त्याच्या एकूण सोयाबीन उत्पादनात महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र हा सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून आहे. मित्रांनो या हंगामात सोयाबीन पेरणीचा कालावधी हा राज्यात मोठा भिन्न आहे. काही ठिकाणी सोयाबीन फळधारणा अवस्थेत असून काही ठिकाणी सोयाबीन फुलोरा अवस्थेत नजरेस पडत आहे.
राज्यात मात्र बहुतांशी सोयाबीन पिकात सध्या दाणे भरले जात आहेत. म्हणजे फळधारणा होत आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकावर वेगवेगळ्या कीटकांचे देखील सावट निर्माण होते. यावर्षी वातावरणात सातत्याने बदल होत असल्याने तसेच ढगाळ वातावरण असल्याने सोयाबीन पिकावर हेलिकोवर्पा आर्मीजेरा या कीटकांचा प्रादुर्भाव बघायला मिळत आहे. या किटकांचा प्रादुर्भाव प्रामुख्याने ऑगस्ट महिन्यातच बघायला मिळतो.
ऑगस्ट महिन्यात साधारणता सोयाबीनची पिके फळधारणा अवस्थेत असतात अशा परिस्थितीत या किटकांचा (Soybean Pest) प्रादुर्भाव झाल्यास हे कीटक सोयाबीनच्या शेंगा खाण्यास सुरुवात करते. यामुळे सोयाबिनच्या उत्पादनात भलीमोठी घट होते. अशा परिस्थितीत या कीटकांवर वेळीच नियंत्रण (Soybean Pest Management) मिळवणे अतिशय आवश्यक असते. आज आपण देखील या कीटकांवर कशा पद्धतीने नियंत्रण (Soybean Crop Management) मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी. जाणकार लोकांच्या मते या कीटकाच्या अळ्या पानांवर आपला उदरनिर्वाह भागवत असतात. हे कीटक साधारणपणे ऑगस्ट महिन्यात येते. हे कीटक सोयाबीनच्या झाडाला पानेहीन बनवून सोडते आणि फुले आणि शेंगा दोन्ही खराब करतात.
कशा पद्धतीने नियंत्रण मिळवता येईल बर…!
प्रति हेक्टरी 50 मीटर अंतराने 5 सापळे लावा.
कुनोल्फास 25 EC @ 1 लिटर प्रति हेक्टरी फवारणी करावी.
लॅम्बडासायक्लोहॅलोथ्रीन 9 C.S. 300 मिली प्रति हेक्टरी फवारणी करावी.
indoxacarb 15.8 sc (333 ml/ha) किंवा tetraniliprol 18.18 sc. (250-300 मिली/हेक्टर) किंवा इमामेक्टिन बेंझोएट (425 मिली/हेक्टर) किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 04.90 सी.एस. (300 मिली/हेक्टर) फवारणी करण्याचा सल्ला दिला जातो.
शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्याअगोदर कृषी क्षेत्रातील जाणकार लोकांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे. येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही याची नोंद घ्यावी.