Soybean Farming: मित्रांनो सोयाबीन (Soybean Crop) पिकाचा निम्मा कालावधी जवळपास संपत आला आहे. आता या अवस्थेत सोयाबीन पिकाची काळजी घेणे अतिशय आवश्यक आहे. मित्रांनो सध्या सोयाबीन काही भागात फुलोरा अवस्थेत आहे तर काही भागात फ्लॉरिंगला नुकतीच सुरुवात झाली आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाची शेतकरी बांधवांना (Farmer) काळजी घ्यावी लागणार आहे.
सोयाबीन पिकातून चांगले उत्पादन मिळविण्यासाठी सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन (Soybean Crop Management) करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या चक्रीभुंगा आणि पाने खाणाऱ्या आळी यावर एकात्मिक नियंत्रण (Soybean Pest Control) कशा पद्धतीने मिळवले जाऊ शकते याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
जाणकार लोकांच्या मते पाने खाणारी अळी आणि चक्रीभुंगा या दोन कीटकांमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या या दोन कीटकांचा वेळीच नायनाट करणे अतिशय महत्त्वाचे ठरते. आज आपण देखील या दोन कीटकांवर एकात्मिक पद्धतीने अशा प्रकारे नियंत्रण मिळवले जाऊ शकते याविषयी चर्चा करणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या बहुमूल्य माहिती विषयी सविस्तर.
मित्रांनो जसे की आपणास ठाऊक आहे, सोयाबीन लागवडीचा कालावधी 100 ते 105 दिवसांचा असतो. म्हणजे आता सोयाबीन पिकाचे अर्धे आयुष्य झाले आहे. म्हणजेच 50 दिवसांचे सोयाबीनचे पीक बनले आहे. सोबतच आगात सोयाबीन पिकात फुले येऊ लागली आहेत. हवामानातील सततच्या बदलामुळे (Climate change) यावेळी कीड व रोगांमुळे सोयाबीन पिकाचेही नुकसान होऊ शकते, सतत पाणी पडल्याने सोयाबीन पिकाचे नुकसान होण्याची शक्यता आहे. अशा वेळी सोयाबीनची योग्य काळजी घेतल्यास सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होते, कारण हा फुलोरा अवस्थेमधला काळ पुढील फळधारणेसाठी उपयोगी ठरतो.
चक्रीभुंगा किटकाचे व्यवस्थापन
चक्री भुंगा (गर्डल बीटल) च्या नियंत्रणासाठी सुरुवातीच्या टप्प्यावर टेट्रानिलीप्रोल 18.18 एस.सी. (250-300 मिली/हेक्टर) किंवा थायक्लोप्रिड 21.7 sc. (750ml/ha) किंवा प्रोफेनोफॉस 50 EC (1L/ha) किंवा imamectin Benzoate (425ml/ha) या प्रमाणात घेऊन फवारणी करावी. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी रोपाचा प्रभावित भाग लवकरात लवकर तोडून नष्ट करण्याचा सल्ला दिला जातो.
चक्रीभुंगा आणि पाने खाणारी अळी यांचे एकात्मिक व्यवस्थापन
चक्री भुंगा आणि पाने खाणाऱ्या आळी यांच्या एकाच वेळी नियंत्रणासाठी प्रिमिक्स्ड कीटकनाशके क्लोराँट्रानिलिप्रोल 09.30% + लॅम्बडा सायहॅलोथ्रिन 04.60% झेडसी (200 मिली/हेक्टर) किंवा बीटासिफ्लुथ्रिन + इमिडाक्लोप्रिड (350 मिली हेक्टर) किंवा प्रिमिक्स्ड थायमेथोक्सम + लॅम्बडा सायहॅलोथ्रीन (125 मिली/हेक्टर) फवारणी करावी. यामुळे स्टेम फ्लाय किटकावर देखील नियंत्रण केले जाऊ शकते.
मित्रांनो इथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही. कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्या अगोदर एकदा कृषी तज्ञांचा तसेच कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अपरिहार्य राहणार आहे.