Soybean Farming: भारतात सोयाबीन या पिकाची (Soybean Crop) खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात शेती (Agriculture) केली जाते. आपल्या राज्यात देखील सोयाबीन पिकाची मोठ्या प्रमाणात शेती नजरेस पडते. खरं पाहता, देशाच्या एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सोयाबिनच्या उत्पादनात भारतात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. अशा परिस्थितीत भारतातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) सर्व अर्थकारण हे सोयाबीन या नगदी पिकाच्या शेतीवरच अवलंबून आहे. मित्रांनो सोयाबीन वाढीचा सध्या एक महत्त्वाचा टप्पा आहे.
सोयाबीन वाढीदरम्यान विशेषता फुलोरा अवस्थेत सोयाबीनची काळजी घेण्याचा वारंवार जाणकारांकडून सल्ला दिला जातो. मित्रांनो सोयाबीनची पिके आता वाढीसाठी सज्ज झाली असून येत्या काही दिवसात फुलोरा अवस्थेत येणार आहेत. काही शेतकरी बांधवांची सोयाबीन फुलोरा अवस्थेत आले देखील असेल अशा वेळी शेतकरी बांधवांनी सोयाबीन पिकाची विशेष काळजी (Crop Management) घेतली पाहिजे.
या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील बरं…!
वारंवार पाऊस पडत असल्यामुळे शेतात पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होत आहेत. यामुळे शेतातून ड्रेनेज सिस्टमची खात्री करावी लागणार आहे. शेतात नियमितपणे निरीक्षण करावे आणि 3-4 ठिकाणी झाडे हलवा जेणेकरून तुमच्या शेतात कीटक/कीटकांचा प्रादुर्भाव आहे की नाही हे समजेल. त्यानुसार त्यांच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाययोजना करा. सोयाबीनमध्ये कीटकनाशक आणि तणनाशकांच्या मिश्र वापरासाठी आतापर्यंत फक्त खालील 3 कीटकनाशके आणि 2 तणनाशकांची शिफारस करण्यात आली आहे.
सोयाबीन पिकात फुलोरा सुरू झाला आहे, त्यामुळे तणनाशक वापरण्यास विसरू नका. शेतात तण अजूनही असल्यास, निंदणी करून नष्ट करा. पिवळ्या मोझॅक रोगास प्रतिबंध करण्यासाठी, पांढऱ्या माशीच्या वेक्टर किडीचे नियंत्रण करण्यासाठी आपल्या शेतात विविध ठिकाणी पिवळे चिकट सापळे लावा. कीटकनाशक फवारणीसाठी शिफारस केलेळ्या प्रमाणात पाणी वापरा (नॅपसॅक स्प्रेयरसह 450 ली./हे. किंवा पॉवर स्प्रेयरसह किमान 120 लि./हे.).
कीटकनाशक फवारणीसाठी कोन नोजलच वापरा. सोयाबीनमध्ये पक्ष्यांना बसण्यासाठी ‘टी’ आकाराचे पक्षी पर्चेस/थांबे ठेवा. कोणत्याही प्रकारचे कृषी निविष्ठा खरेदी करताना, नेहमी बॅच क्रमांक आणि कालबाह्यता तारीख स्पष्टपणे नमूद करून दुकानदाराकडून ठोस बिल घ्या. सोयाबीनची सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकरी बांधवांनी पिकाच्या संरक्षणासाठी बॅसिलस थुरिंगिएन्सिस किंवा ब्युवेरिया बेसियाना किंवा नोमुरिया रेली (1.0 लि./हेक्टर) वापरा आणि पाने खाणाऱ्या सुरवंटांपासून सुरुवातीच्या टप्प्यात प्रतिबंध करा.
कीटक-विशिष्ट फेरोमोन सापळे किंवा बाजारात उपलब्ध असलेले प्रकाश सापळे तंबाखू सुरवंट आणि हरभरा सुरवंट याच्या नियंत्रणासाठी वापरा.
हे काम करु नका बरं…!
सतत पडणाऱ्या पाण्यामुळे सोयाबीनचे पीक पिवळे पडल्याचे वृत्त आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात युरिया खताचा वापर करू नये.
ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ डॉ.आर.डी.खरे यांच्या मते, शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकात युरियाचा अधिक वापर केल्यास पीक तर वाढेलच, पण फुलांवर व फळांवर विपरीत परिणाम होईल, फुले गळायला लागतील.
त्याच वेळी, शेंगा देखील कमकुवत होऊ शकतात. या ऐवजी 4 किलो नत्र प्रति बिघा या प्रमाणात सोयाबीन पिकाला देता येईल.