Soybean Farming: भारतात सोयाबीन (soybean crop) या पिकाची मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. सोयाबीन खरे पाहता एक नगदी (Cash crop) आणि तेलबिया पीक आहे. यामुळे या पिकाची बाजारात मोठी मागणी असते.
गेल्या वर्षी सोयाबीन पिकाला चांगला समाधानकारक बाजार भाव (Soybean rate) मिळाला होता. या वर्षी देखील सोयाबीन पिकाला चांगला बाजारभाव मिळेल अशी सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची (Soybean grower farmer) आशा आहे. यामुळे राज्यात सोयाबीन पिकाचे क्षेत्र दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यातील विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्रातील काही भाग आणि खानदेश मधील काही भागात मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची शेती केली जाते.
निश्चितच राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे (Farmer) सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर अवलंबून आहे. मित्रांनो सोयाबीन हे एक हमीचे पीक आहे मात्र असे असले तरी सोयाबीन पिकाचे व्यवस्थापन (Soybean crop management) करणे देखील अतिशय महत्त्वाचे ठरते.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीन पीक व्यवस्थापनातील काही महत्त्वाच्या बाबी जाणून घेणार आहोत. मित्रांनो सध्या राज्यातील सोयाबीन पिकं फुलोरा अवस्थेत आहे. काही ठिकाणी सोयाबीन पिकाची फ्लॉवरिंग सुरू आहे. अशा परिस्थितीत आज आपण फुलोरा अवस्थेत सोयाबीन पिकाची कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे या महत्त्वपूर्ण बाबीविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो सोयाबीन पिकाची फुलोरा अवस्थेत घ्यावयाची काळजी जाणून घेऊया.
सोयाबीन पिकाची फुलोरा अवस्थेत घ्यावयाची काळजी
जाणकार लोकांच्या मते सोयाबीन पिकाची फुलोरा अवस्थेत काळजी न घेतल्यास सोयाबीन पिकाच्या उत्पादनात मोठी घट होऊ शकते. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी फुलोरा अवस्थेत सोयाबीनची विशेष काळजी घेतली पाहिजे.
तज्ञांच्या मते, शेतकरी बांधवांनी सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना पिकाची निंदणी किंवा खुरपणी तसेच कोळपणी करू नये. तज्ञांच्या मते खुरपणी कोळपणी किंवा निंदणी करताना सोयाबीन पिकाला धक्का लागू शकतो आणि यामुळे सोयाबीन पिकाची कोवळी फुले पडू शकतात. अशा परिस्थितीत सोयाबीन पिकाची फळधारणा कमी होऊ शकते. निश्चितच फुलोरा अवस्थेत असताना सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांनी सोयाबीनची आंतरमशागत करू नये.
शेतकरी बांधवांनी सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना कोणत्याही प्रकारची रासायनिक औषधाची फवारणी करू नये. तज्ञांच्या मते रासायनिक औषध फवारणी केल्यास फुलगळ होण्याची शक्यता असते. शिवाय रासायनिक औषधांची फवारणी केल्यास फुलांवर डाग पडतात आणि फुल कमजोर होऊन गळते.
सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना कोणत्याच तणनाशकाची फवारणी शेतकरी बांधवांनी करू नये. यामुळे देखील फुलगळ होण्याची शक्यता असते.
फुलोरा अवस्थेत असताना कीटकनाशकांची फवारणी टाळावी. शेतकरी बांधवांनी कीटकनाशकाची फवारणी फुलोरा अवस्थेच्या आधी आणि फळधारणा झाल्यानंतर करावी.
फुलोरा अवस्थेत योग्य प्रमाणात सोयाबीन पिकाला पाणी दिले पाहिजे सोयाबीन पिकाला पाण्याचा ताण पडल्यास देखील फुलगळ होण्याची दाट शक्यता असल्याचा दावा तज्ज्ञांकडून केला जात आहे.
तज्ञांच्या मते शेतकरी बांधवांनी सोयाबीन पीक फुलोरा अवस्थेत असताना सोयाबीन शेतात जाणे शक्यतो टाळावे. यामुळे परागीभवनाच्या क्रियेत अडथळा येत असल्याचा दावा केला जातो.