Soybean Farming: भारतात खरीप हंगामात (Kharif Season) मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची (Soybean Crop) शेती केली जाते. आपल्या राज्यातही मोठ्या प्रमाणात सोयाबीन पिकाची लागवड (Soybean Farming) केली जाते.
राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधव सोयाबीन या मुख्य पिकावर अवलंबून आहेत. खरीप हंगामात लागवड केल्या जाणाऱ्या या नगदी पिकातून (cash crop) शेतकरी बांधवांना चांगली तगडी कमाई देखील होत असते. मात्र असे असले तरी सोयाबीन पिकात पीक व्यवस्थापन (crop management) अतिशय महत्त्वाचे ठरते.
मित्रांनो खरे पाहता खरीप हंगामातील सर्व पिकांवर रोगराई चे सावट मोठ्या प्रमाणात बघायला मिळते. सोयाबीन या पिकावर देखील वेगवेगळ्या किडींचा तसेच रोगांचे (soybean disease) सावट यावेळी बघायला मिळते. खरीप हंगामात पावसामुळे सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात कीटकांचे सावट असते.
अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी पिक निरीक्षण करून वेळीच यावर नियंत्रण मिळवणे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. मित्रांनो आज आम्ही आपल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (soybean grower farmer) सोयाबीन पिकासाठी घातक ठरणाऱ्या रस शोषक किडींचे कशा पद्धतीने व्यवस्थापण किंवा नियंत्रण केले जाऊ शकते याविषयी जाणून घेणार आहोत. जाणकार लोकांच्या मते, रसशोषक किडींमुळे सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते.
यामुळे उत्पादनात मोठी घट होते परिणामी सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत जर सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांनी वेळीचं या किडीवर नियंत्रण मिळवले तर निश्चितच उत्पादनात भरीव वाढ होणार आहे, परिणामी उत्पन्न देखील चांगले मिळणार आहे.
सोयाबीन हे एक खरीप हंगामातील मुख्य पिक आहे. या पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव बघायला मिळतो. यामुळे याच्या व्यवस्थापनासाठी सोयाबीन संशोधनालय इंदौर यांनी खालील फवारणीची शिफारस केली आहे. शिफारसीनूसार, थायामिथॉक्झाम 25% 40 ग्रॅम प्रति एकर या प्रमाणात फवारणी केल्यास या किडीवर नियंत्रण मिळवण्यात मदत होणार आहे. यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात भरीव वाढ होणार आहे.
याशिवाय सोयाबीन संशोधनालय इंदोर या संस्थेने सोयाबीन पिकावरील शेंगा करपाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी देखील फवारणी सुचवलेली आहे. शेंगावर येणाऱ्या करपाच्या नियंत्रणासाठी फुलोरा अवस्थेतील सोयाबीन पिकावर टेब्यूकोनॅझोल 10% डब्ल्यूपी + सल्फर 65% डब्ल्यूजी 15 ग्राम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मित्रांनो कोणत्याही पिकावर कोणत्याही औषधाची फवारणी करण्याअगोदर कृषी तज्ञांचा सल्ला किंवा कृषी सेवा केंद्र चालक यांचा सल्ला घेणे अतिशय आवश्यक आणि अपरिहार्य राहणार आहे. आम्ही येथे दिलेली माहिती ही कोणत्याही परिस्थितीत अंतिम राहणार नाही.