Soybean Farming : सोयाबीन हे खरीप हंगामातील एक प्रमुख पीक आहे. या पिकाचे लागवडीखालील क्षेत्र महाराष्ट्रात विशेष उल्लेखनीय आहे. अशा स्थितीत आज आपण सोयाबीन उत्पादकांसाठी एक कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण सोयाबीन वाण निवडताना शेतकऱ्यांनी कोणत्या बाबींची काळजी घेतली पाहिजे याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कृषी तज्ञ सांगतात की, कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी त्या पिकाच्या सुधारित वाणाचा मोठा वाटा असतो.
यामुळे सोयाबीन पिकातून चांगले दर्जेदार आणि विक्रमी उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी त्याच्या सुधारित जातींची निवड करणे अनिवार्य आहे.
म्हणून आज आपण सोयाबीनचे वाण निवडताना शेतकऱ्यांनी कोणत्या बाबी तपासून घेतल्या पाहिजेत हे जाणून घेणार आहोत. तसेच फुले संगम या सोयाबीन वाणाविषयी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
हे पण वाचा :- कांदा अनुदान योजना 2023 : शेतकऱ्यांनी ‘हा’ अहवाल जमा केल्याशिवाय 350 रुपये प्रति क्विंटल कांदा अनुदान मिळणार नाही !
सोयाबीन वाण निवडताना ही काळजी घ्या
हवामान बदलास प्रतिकारक व स्थानिक हवामानास अनुकूल अशा वाणाची निवड केली पाहिजे. यामध्ये फुले किमया, फुले संगम, जे एस 335, जे एस 9305, एम ए यु एस 71, एम ए यु एस 612 इत्यादी सोयाबीन वाणाची पेरणी शेतकरी करू शकतात.
जर शेतकरी फुले संगम या जातीची पेरणी करत असतील तर अधिक दाट पेरणी शेतकऱ्यांनी करू नये अन्यथा उत्पादनात घट होते. अनेक शेतकऱ्यांना असा अनुभव आला आहे.
फुले संगम या वाणाची पेरणी केल्यास चक्रीभुंगा आणि खोड अळी सारख्या कीटकांचा प्रादुर्भाव अधिक पाहायला मिळतो. यामुळे या कीटकांच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना आधीपासूनच तयारी करून ठेवावी लागणार आहे.
फुले संगम या वाणाची पेरणी भारी जमिनीत करण्याचा सल्ला दिला जातो. हलक्या जमिनीत या वाणाची लागवड करू नये असे मत काही शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.
हे पण वाचा :- दिलासादायक; ‘या’ योजनेसाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना 52 लाखाचे अनुदान वाटप !
तसेच फक्त फुले संगम या एकाच जातीची पेरणी करण्याऐवजी शेतकरी बांधव याच्या जोडीला फुले किमया या जातीची देखील पेरणी करू शकतात. म्हणजे काही क्षेत्रावर फुले संगम आणि काही क्षेत्रावर फुले किमया अशा पद्धतीने पेरणीचे नियोजन शेतकऱ्यांनी केले तर त्यांना चांगला फायदा होऊ शकतो.
जर जमीन मध्यम प्रतीची असेल तर फुले किमया, फुले दुर्वा किंवा इतर सोयाबीन जातीची पेरणी शेतकरी करू शकतात. मध्यम जमिनीमध्ये फुले संगम या जातीची पेरणी करू नये असे सांगितले जात आहे.
गेल्या काही वर्षांपासून राज्यातील सोयाबीन उत्पादक जिल्ह्यांमध्ये फुले किमया या जातीपासून शेतकऱ्यांना चांगले उत्पादन मिळाले आहे. मात्र यासाठी पीक व्यवस्थापन योग्य पद्धतीने करणे जरुरीचे राहते.
हे पण वाचा :- 5 हजार रुपये प्रति किलो दराने विकल्या जाणाऱ्या काळ्या हळदीची लागवड शेतकऱ्यांना बनवणार मालामाल ! पहा….