Soybean Farming : सोयाबीनची (Soybean) गणना तेलबिया पिकाच्या श्रेणीत केली जाते. भारतात खरीप हंगामात (Kharif Season) याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. आपल्या राज्यातही खरीप हंगामातील सोयाबीन एक मुख्य पीक आहे.
मात्र असे असले तरी शेतकरी बांधवांनी (Farmer) गेल्या उन्हाळी हंगामात सोयाबीनची यशस्वी लागवड करून दाखवली आहे. त्यामुळे आता सोयाबीन उन्हाळी हंगामात देखील लावता येत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि राजस्थान या तीन राज्यात देशातील एकूण सोयाबीन लागवडपैकी सुमारे 96% सोयाबीन लागवड केली जाते.
मित्रांनो देशात सर्वत्र खरीप पिकांच्या पेरणीला सुरुवात झाली आहे. दरम्यान, सोयाबीनची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांनीही (Soybean Grower Farmer) शेत तयार करण्यास सुरुवात केली आहे. आपल्या राज्यातील शेतकरी बांधव देखील सोयाबीन पेरणीसाठी सध्या लगबग करत असल्याचे चित्र बघायला मिळत आहे.
सोयाबीन उत्पादनात मध्य प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे. मध्यप्रदेश पाठोपाठ महाराष्ट्र सोयाबीन उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर आहे. सोयाबीनला गेल्या काही वर्षापर्यंत पिवळ सोन म्हणून शेतकरी बांधव संबोधत असत.
मात्र गेल्या काही वर्षात देशात सोयाबीनची लागवड कमी झाली आहे. असे असले तरी गतवर्षी सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळाला असल्याने यावर्षी सोयाबीनच्या क्षेत्रात वाढ होणार असल्याचे कृषी तज्ञ सांगताहेत.
सोयाबीनची लागवड कोणत्या जमिनीवर केली जाते
कृषी तज्ञांच्या (Agricultural experts) मते, सोयाबीनची लागवड अधिक हलकी वालुकामय व हलकी जमीन वगळता सर्व प्रकारच्या जमिनीवर करता येते. सोयाबीन लागवड करताना एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही जिथे शेती कराल तिथे पाण्याचा निचरा करण्याची चांगली व्यवस्था असावी.
शेतात पाणी साचल्याने पिकांची नासाडी होण्याची दाट शक्यता असते. असे झाल्याने शेतकरी बांधवांना हजारो रुपयांचा भुर्दंड सहन करावा लागतो.
सोयाबीन केव्हा पेरायचे
मित्रांनो कृषी तज्ञांच्या मते, खरीप हंगामात सोयाबीन पिकाची पेरणी जूनच्या शेवटच्या आठवड्यात आणि जुलैच्या पहिल्या आठवड्यात केली जाते. जास्त उशीर होत असल्यास जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत पेरणी करता येणे शक्य आहे.
सोयाबीनची पेरणी ओळीत करावी असा सल्ला दिला जातो. निश्चितच सोयाबीन पेरणीचा टाइम आता झाला आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधव अचूक वेळ साधत सोयाबीन पेरणी करून लाखो रुपयांची कमाई या खरीप हंगामात करू शकणार आहेत.