Soybean Farming : यंदा चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मान्सून 2024 मध्ये अर्थात जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीमध्ये यावर्षी चांगल्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. परिणामी यंदा खरिप हंगामामध्ये सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढणार असा दावा होत आहे. दरम्यान जर तुम्हीही यंदा सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर तुमच्यासाठी आजची बातमी खूपच खास ठरणार आहे. कारण की आज आपण सोयाबीनचा लोकप्रिय वाण ग्रीन गोल्ड 3444 याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर गेल्या काही वर्षांमध्ये या जातीचे सोयाबीन लागवडीखालील क्षेत्र वाढले आहे. अनेकांनी या जातीच्या लागवडीला पसंती दाखवली आहे. अशा परिस्थितीत या जातीच्या विशेषता समजून घेणे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे.दरम्यान आज आपण सोयाबीन ग्रीन गोल्ड 3444 या जातीच्या विशेषतः अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच सोयाबीनच्या इतरही काही प्रमुख जातींची आज आपण माहिती पाहणार आहोत.
ग्रीन गोल्ड 3444 च्या विशेषता
मिळालेल्या माहितीनुसार या जातीचे पीक 95 ते 100 दिवसांच्या कालावधीत परिपक्व होते. या जातीच्या पिकाला मोठ्या प्रमाणात फुलधारणा होते. कृषी तज्ञ सांगतात की या जातीच्या सोयाबीनला लांबट/लहान आकाराची पानं आसल्याने खोडापर्यंत सुर्यप्रकाश मिळतो, हेच कारण आहे की या जातीला मुबलक प्रमाणात फुलधारना होते.
जवळपास 60% शेंगा 4 दाने आसलेल्या असतात. पाणी साचलेल्या ठिकाणी सुद्धा सोयाबीनचा हा वाण तग धरून राहतो. यामुळे अतिवृष्टी होत असलेल्या भागात याची लागवड केली तरीदेखील बऱ्यापैकी उत्पादन मिळू शकणार आहे.
सोयाबीनचे इतर प्रमुख वाण
के डी एस 992 : या जातीला फुले दूर्वा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर ओळखले जाते. महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ केलेला हा सोयाबीनचा एक उत्कृष्ट वाण आहे. या जातीचे पीक सरासरी 100 ते 105 दिवसात परिपक्व होते. या जातीला जास्तीत जास्त फांद्या लागतात.
विविध कीटकांना आणि रोगांना ही जात कमी प्रमाणात बळी पडते. या जातीचे दाणे टपोरे आणि वजनदार असतात. जर तुम्ही टोकन पद्धतीने लागवड करण्याच्या तयारीत असाल तर या जातीची तुम्ही निवड केली पाहिजे.
MAUS 612 : या जातीचे सोयाबीन पीक ऍव्हरेज 100 दिवसात काढणीसाठी तयार होते. हा वाण प्रतीकुल वातावरणात देखील तग धरुन राहतो. उदा. अतीव्रुष्टी/कमी पाऊस ई. परिस्थितीमध्ये या जातीच्या सोयाबीन पिकातून चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे.
या जातीचे पीक उंच वाढते. जेव्हा पीक हार्वेस्टिंग साठी तयार होते तेव्हा शेंगा तडकत नाहीत. यामुळे नुकसान कमी होते. राज्यातील हवामान या जातीसाठी अनुकूल असल्याचे आढळून आले आहे.
KDS 726 : केडीएस 726 अर्थातच फुले संगम ही जात राहुरी कृषी विद्यापीठाने विकसित केलेली आहे. या जातीच्या पिकातून शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळत आहे. याचा पीक परिपक्व कालावधी हा जवळपास 105 ते 110 दिवस एवढा आहे.
या जातीच्या सोयाबीनचे दाणे टपोरे आणि आकर्षक असतात. टोकन पद्धतीने लागवड करायची असली तर हा वाण उत्कृष्ट ठरतो. मात्र येलो मोजक आणि किडींना लवकर बळी पडतो. यामुळे या जातीची लागवड करायची झाल्यास योग्य पद्धतीने नियोजन करणे आवश्यक आहे.