Soybean Farming : ज्या शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी आजचा हा लेख खूपच कामाचा ठरणार आहे. खरे तर, सोयाबीन हे राज्यात उत्पादित होणारे एक महत्त्वाचे नगदी पीक आहे. या पिकाची संपूर्ण राज्यभर लागवड केली जाते. राज्यातील मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये या पिकाची सर्वाधिक लागवड होते.
देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात आपल्या महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे. महाराष्ट्र हे सोयाबीन उत्पादनाच्या बाबतीत देशात दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहे. मध्य प्रदेश हे या यादीत पहिल्या स्थानावर आहे.
येथे देशाच्या एकूण उत्पादनापैकी 45% उत्पादन घेतले जाते. तसेच, राज्यात देशाच्या एकूण उत्पादनापैकी जवळपास 40 टक्के उत्पादन होते. यावरून आपल्या राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे सोयाबीनवर अर्थकारण अवलंबून असल्याचे दिसते.
मात्र गेल्या काही वर्षांपासून शेतकऱ्यांनां सोयाबीन पिकातून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचे वास्तव आहे. सोयाबीनचे एकरी उत्पादन मोठ्या प्रमाणात घसरले आहे.
त्यामुळे आज आपण सोयाबीन पिकाची फुलधारणा आणि फळधारणा वाढवण्यासाठी कोणत्या औषधाची फवारणी केली पाहिजे याविषयी थोडक्यात माहिती घेऊन हजर झालो आहोत.
या औषधाच्या फवारणीमुळे वाढणार सोयाबीनचे उत्पादन
सोयाबीन पिकात फुलधारणा आणि फळधारणा जेवढी चांगली होईल तेवढेच उत्पादन वाढणार आहे. त्यामुळे फुलगळ होणार नाही याची शेतकऱ्यांनी काळजी घेतली पाहिजे.
तसेच फुलांची आणि फळांची संख्या वाढवण्यासाठी देखील शेतकऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजेत. यासाठी शेतकऱ्यांना एका औषधाची फवारणी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दैनिक या औषधाची फवारणी केल्यास सोयाबीन पिकात फुलांची संख्या वाढते आणि फळधारणा देखील चांगली होते. यामध्ये अमिनो आणि पेपटिक ऍसिड असते.
यामध्ये कार्बनिक आणि गैर कार्बनिक कंटेंट आढळतात. यामुळे पिकाची गुणवत्ता सुधारते. फुल आणि फळांची संख्या वाढवण्यासाठी हे औषध कारगर सिद्ध ठरते.
यामुळे सोयाबीनमध्ये होत असणारी फुल गळती देखील थांबते. हे औषध मार्केटमध्ये सीओ 1010 एल या नावाने उपलब्ध आहे. याचा वापर कडधान्य पिकांमध्येही केला जाऊ शकतो.