Soybean Crop Management : सोयाबीन हे महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, खानदेशसहित उत्तर महाराष्ट्र विभागात मोठ्या प्रमाणात उत्पादित केले जाणारे खरीप हंगामातील एक महत्त्वाचे पीक आहे. दरम्यान, आज आपण सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची माहिती घेऊन हजर झालो आहोत.
आज आपण सोयाबीन पिकातील तण नियंत्रणासाठी कोणत्या तणनाशकाचा वापर केला पाहिजे या विषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत.
चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया याविषयी सविस्तर. आज आपण सोयाबीन पिकात उगवण पूर्व आणि उगवणीनंतर कोणत्या तन नाशकाचा वापर केला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत.
उगवणपूर्व कोणते तन नाशक वापरले पाहिजे ?
उगवण पूर्व तणनाशक हे सोयाबीन उगवणीपूर्व तननाशक फवारावे लागते. साधारणता पेरणीनंतर 48 तासांनी उगवण पूर्व तणनाशकाची फवारणी करतात.
मात्र कोरड्या जमिनीसाठी आणि ओल्या जमिनीसाठी वेगवेगळ्या तणनाशकाची निवड करावी लागते. जर समजा तुम्ही कोरड्या जमिनीत फवारणी करणार असाल तर पेंडीमेथालीन 38.70% सीएस हे घटक असणारे तणनाशक वापरायचे आहे.
यामध्ये तुम्ही यूपीएल कंपनीचे दोस्त सुपर, धनुका कंपनीचे धनु टॉप सुपर, बी ए सी एफ कंपनीचे स्टॉम्प एक्स्ट्रा यापैकी कोणतेही एक तणनाशक वापरू शकता.
यासाठी 700 एमएल प्रति एकर असे प्रमाण घ्यायचे आहे. मात्र जर तुम्ही ओल्या जमिनीत म्हणजे वापसा कंडिशन मध्ये फवारणी करणार असाल तर पेंडीमेथालीन 30% ईसी घटक असणारे तणनाशक फवारले पाहिजे.
यामध्ये तुम्ही यूपीएल कंपनीच दोस्त, बी ए सी एफ कंपनीचे प्लॉड यापैकी कोणतेही एक तणनाशक एक लिटर प्रति एकर या प्रमाणात फवारू शकता.
सोयाबीन उगवणीनंतर कोणते तणनाशक फवारणार
सोयाबीन उगवण झाल्यानंतर तन नाशक फवारायचे असेल तर साधारणतः 25 ते 30 दिवसांनी तुम्ही फवारणी केली पाहिजे. यामध्ये तुम्ही अदामा कंपनीचे शेक या तणनाशकांची 800 एम एल प्रति एकर या प्रमाणात फवारणी करू शकता.
सिजेंटा कंपनीचे फ्युजी फ्लेक्स या तणनाशकाची 400 एम एल प्रति एकर या प्रमाणात फवारणी करू शकता. यूपीएल कंपनीचे लगाम या तणनाशकाची 400 एम एल प्रति एकर या प्रमाणात फवारणी करू शकता.