Soybean Crop Management : यंदा मान्सून खूपच कमकुवत आहे. जून महिना संपला आहे. जुलै महिन्याचा पहिला आठवडा देखील उलटला आहे. मात्र राज्यातील बहुतांशी भागात अजूनही मान्सूनचा पाऊस पडलेला नाही. राज्यात सर्वत्र पावसाची केवळ रिपरिप पाहायला मिळत आहे. जोरदार पाऊस केवळ कोकणात आणि घाटमाथ्यावरच पडत आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात तर पावसाचा जोर खूपच कमी आहे. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी संभ्रमावस्था पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे आता जुलैचा पहिला आठवडा संपत चाललाय तरी देखील राज्यातील बहुतांशी भागात पेरणी झालेली नाही. मात्र येत्या काही दिवसात चांगला पाऊस होणार असा अंदाज आहे.
हवामान विभागाने आजपासून पावसाचा जोर वाढणार असा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आगामी काही दिवसात सोयाबीन पेरणीला वेग येणार असे चित्र आहे. दरम्यान आज आपण सोयाबीन पेरणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी कोणत्या औषधाची पहिली फवारणी केली पाहिजे? याबाबत जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कृषी तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीन पेरणी केल्यानंतर सुरुवातीचा एक महिना हा पिकासाठी खूपच महत्त्वाचा राहतो. कारण की या काळात चक्रीभुंगा आणि खोडकिड या कीटकांमुळे पिकाचे नुकसान होण्याची दाट शक्यता असते.
यामुळे पहिले फवारणी ही याच कीटकांच्या नियंत्रणासाठी मारावी लागणार आहे. जर तुमच्याही पिकात या दोन्ही कीटकांचा प्रादुर्भाव आढळला तर तुम्ही पहिली फवारणी या दोन कीटकांच्या नियंत्रणासाठीच मारा.
खालीलपैकी कोणत्याही एका कॉम्बिनेशनची फवारणी करा
1)क्लोरोपायरीफाँस + सायपरमेथ्रीन 50 % EC प्रमाण 25 ml ( प्रती पंप )
2)सिजेन्ता चे अलीका (Thaimethoxam 12.6% lamda cyhalothrin 9.5%) याचे प्रमाण 10 ते 12 ml( प्रती पंप)
3)ईमामेक्टीन बेन्झोईट 5% (Emamectin Benzoate 5%sg) प्रमाण 10 gm.( प्रती पंप)
वर दिलेल्या तीन कॉम्बिनेशनपैकी आपण कोणत्याही एका कॉम्बिनेशनची फवारणी करू शकता. फवारणी करण्यापूर्वी मात्र कृषी सेवा केंद्र चालक किंवा कृषी तज्ञांचा सल्ला तुमच्यासाठी जरुरीचा राहणार आहे.