Soybean Bajarbhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य पीक आहे. या पिकाची शेती (Soybean Farming) महाराष्ट्रातील मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र खानदेश या विभागात पहायला मिळते. अर्थातच सोयाबीन पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून आहे.
भारताच्या एकूण सोयाबीन उत्पादनाचा विचार केला तर मध्य प्रदेश नंतर महाराष्ट्राचा नंबर लागतो. विशेष म्हणजे गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला विक्रमी बाजार भाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. गेल्या वर्षी सुरुवातीच्या टप्प्यात अकरा हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव सोयाबीनला मिळाला.
मात्र तद्नंतर सरकारच्या सोयाबीन आयातीला परवानगी देण्याच्या निर्णयानंतर सोयाबीन बाजार भावात (Soybean Market Price) कमालीची घसरण झाली. मात्र असं असलं तरी गेल्या वर्षी हंगामाच्या शेवटी देखील सोयाबीनला सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव होता. मात्र या वर्षी हंगामाच्या सुरवातीपासूनच सोयाबीन बाजार भाव दबावात असून सोयाबीनला अवघा पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास बाजार भाव मिळत आहे.
यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधव (Farmer) चिंतेत सापडला आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांपुढे सोयाबीन बाजारात नेमके काय सुरू आहे तसेच सोयाबीनचे बाजार भाव वाढतील का हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे आज आपण सोयाबीन बाजारभावाबाबत तज्ज्ञ लोकांनी दिलेली माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या आंतरराष्ट्रीय बाजार भाव सोयाबीनचे दर स्थिर आहेत, यामुळे देशांतर्गत बाजारपेठेत देखील सोयाबीन बाजार भावात स्थिरता पाहायला मिळत आहे. दरम्यान तिकडे रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात सूर्यफूल तेलाची टंचाई निर्माण झाली आहे. युक्रेन हा सूर्यफूल तेल उत्पादनासाठी जगात विशेष ओळखला जातो.
मात्र या दोन देशात सुरू असलेल्या युद्धामुळे सूर्यफूल तेलाची टंचाई आंतरराष्ट्रीय बाजारात निर्माण झाली आहे. परिणामी सोयाबीन तेलाला मागणी आली आहे. यामुळे सोया तेलाचे भाव देखील वाढले आहेत. सध्या देशांतर्गत सोयाबीन तेल 1230 रुपये प्रति दहा किलोच्या दराने विक्री होत आहे. मात्र असे असले तरी सोयाबीनच्या दरात वाढ झालेली नाही सोयाबीन बाजारभाव अजूनही स्थिर आहे. दरम्यान सध्या परतीच्या पावसामुळे सोयाबीन पिकाचे मोठे नुकसान होत आहे अशा परिस्थितीत सोयाबीनच्या किमान दरात वाढ झाली आहे.
कमाल दर मात्र वाढलेले नाहीत. दरम्यान सध्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पैशांची चणचण शेतकरी बांधवांना भासत असल्याने शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणात सोयाबीन विकत आहे. त्यामुळे बाजारात सोयाबीनची आवक थोड्या प्रमाणात वाढली आहे. आवक वाढली म्हणजे बाजार भाव दबावात येतात हे बाजारपेठेचं सूत्र आहे. सोयाबीन बाजारभाव देखील आवक वाढल्याने दबावात आले आहेत.
सध्या देशांतर्गत सोयाबीनला 4300 ते 5200 रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव पाहायला मिळत आहे. खरं पाहता जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोयापेंड मागणी बाजारात कमी असल्याने सोयाबीन बाजार भावात स्थिरता पाहायला मिळत आहे. मात्र दिवाळीनंतर सोयाबीन आवक मर्यादेत राहिल्यास सोयाबीन दरवाढीची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र जर सोयाबीनची आवक वाढली तर दर असेच कायम राहणार आहेत. एकंदरीत भविष्यात सोयाबीनचे दर सोयाबीन आवकेवर अवलंबून राहणार आहेत.