Soybean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्रात उत्पादित केल जाणार एक मुख्य नगदी पीक (Cash Crop) आहे. या पिकाची आपल्या महाराष्ट्रात खरीप हंगामात सर्वत्र शेती (Agriculture) पाहायला मिळते. अर्थातच या पिकावर महाराष्ट्रातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे (Farmer) अर्थकारण अवलंबून असते.
मित्रांनो खरे पाहता गेल्यावर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजारभाव (Soybean Rate) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाली आहे. शेतकरी बांधवांनी सोयाबीनला चांगला बाजार भाव (Soybean Market Price) मिळेल या आशेने सोयाबीनची मोठ्या प्रमाणात पेरणी केली.
मात्र सध्या सोयाबीनला मिळत असलेला बाजार भाव शेतकरी बांधवांच्या मनासारखा नसून या बाजारभावात सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्कील असल्याचे शेतकरी नमूद करत आहेत. अशा परिस्थितीत आगामी काळात सोयाबीन बाजार कसा राहतो याकडे शेतकरी बांधवांचे लक्ष लागून आहे. यातच अमेरिकेच्या कृषी विभागाने यावर्षी ब्राझील आणि अर्जेंटिना जे की सोयाबीन उत्पादनासाठी संपूर्ण जगात विशेष ओळखले जातात या देशांमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात वाढ होणार असल्याचा दावा केला आहे.
यामुळे ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशात किती सोयाबीन उत्पादन होतं यावर बाजाराचा कल ठरणार आहे. दरम्यान, जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार या देशातील सोयाबीन पिकाला ला निना स्थितीचा फटका बसत असतो, या वर्षी देखील ही परिस्थिती उद्भवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत या देशातील सोयाबीन उत्पादनात घट होण्याची शक्यता काही जाणकार लोकांनी वर्तवली आहे. तर दुसरीकडे अमेरिकेतील सोयाबीन उत्पादन या वर्षी दुष्काळामुळे घटल आहे.
अमेरिकेत कधी नव्हे तो भीषण दुष्काळ पाहायला मिळाला असल्यामुळे अमेरिकेच्या सोयाबीन उत्पादनात कमालीची घट झाली आहे. अमेरिका प्रमुख सोयाबीन उत्पादक देश असल्याचा तमगा मिरवतो. अशा परिस्थितीत जागतिक बाजारपेठेत सोयाबीन पुरवठा कुठे ना कुठे विस्कळीत झाला आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात अजूनही सोयाबीनचे दर टिकून असल्याचे तज्ञांचे मत आहे. दुसरीकडे आपल्या भारताच्या उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर जाणकार लोकांनी सांगितल्याप्रमाणे भारतात सोयाबीन उत्पादनात घट होण्याची चिन्हे पाहायला मिळत आहेत.
जाणकार लोकांच्या मते सध्या भारतातील प्रमुख सोयाबीन उत्पादक राज्यात परतीच्या पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत परतीच्या पावसाचा काढण्यासाठी आलेल्या सोयाबीन पिकाला मोठा फटका बसत आहे. यामुळे सोयाबीन पिकाच्या उत्पादनात घट होणार असल्याचे त्यांचे मत आहे. तर दुसरीकडे डॉलर रुपयापेक्षा मजबूत आहे त्यामुळे ही स्थिती सोयाबीन निर्यातीसाठी फायदेशीर ठरणार आहे.
मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, देशांतर्गत सोयाबीन बाजारात सध्या नवीन सोयाबीनला साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल 4700 रुपये प्रति क्विंटलपर्यंत बाजार भाव मिळत आहे. तसेच जून सोयाबीन पाच हजार रुपये पाच हजार 500 रुपये प्रति क्विंटलपर्यंत विक्री होत आहे. सध्या नवीन सोयाबीन पेक्षा जुन्या सोयाबीनला चांगला बाजार भाव मिळत आहे. व्यापारी लोक नवीन सोयाबीनमध्ये जास्त ओलावा असल्याचे कारण पुढे करत भाव हाणून पाडत असल्याचा आरोप देखील शेतकरी करत आहेत.
तसेच काही जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सोयाबीनला काय बाजार भाव मिळेल याचा आता अंदाज बांधता येणं जवळपास अशक्य आहे. मात्र असे असले तरी सध्या सोयाबीन पिकाला किमान पाच हजार ते पाच हजार 500 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा बाजार भाव मिळणे अपेक्षित आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी बाजारपेठेचा आढावा घेत आणि आपल्या गरजेनुसार टप्प्याटप्प्याने सोयाबीनची विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे.