Soybean Bajar Bhav : राज्यात सोयाबीनच्या बाजार भावात (soybean rate) मोठी घसरण झाली आहे. राज्यातील सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांसाठी (farmer) ही एक निश्चितच चिंतेची बाब आहे. मित्रांनो राज्यात सोयाबीन लागवडीखालील (soybean farming) क्षेत्र विशेष उल्लेखनीय आहे.
अशा परिस्थितीत राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (cash crop) अवलंबून असते. गेल्या वर्षी सोयाबीनला चांगला समाधानकारक बाजार भाव (soybean market price) मिळाला असल्याने या वर्षी सोयाबीन लागवडीखालील क्षेत्रात थोडीशी वाढ झाली आहे.
दरम्यान आता सोयाबीन हंगाम सुरू झाला आहे. हंगाम सुरू झाला असून बाजारात आता नवीन सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात येत आहे. मात्र नवीन सोयाबीन बाजारात दाखल होताच व्यापार्यांनी सोयाबीनचे बाजार भाव हाणून पाडले आहेत. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते, सोयाबीन खरेदी करणारे व्यापारी सध्या आवक होत असलेल्या सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्याचे कारण पुढे करत सोयाबीनचे बाजार भाव मुद्दामून हाणून पाडत असल्याचा आरोप करत आहेत.
गेल्या काही महिन्यांपूर्वी सोयाबीनला पाच ते सहा हजार रुपये प्रतिक्विंटल असा बाजार भाव मिळत होता. मात्र आता यामध्ये लक्षणीय घट झाली असून नवीन सोयाबीन बाजारात येताच चार ते साडेचार हजार रुपये प्रति क्विंटल एवढाच बाजार भाव सोयाबीनला मिळत आहे. म्हणजे क्विंटल मागे हजार ते दीड हजार रुपयांची घसरण नमूद करण्यात आली आहे. यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आर्थिक भुर्दंड बसत आहे.
हे पण वाचा : उसाला मिळणारी एफआरपी म्हणजे काय? याचे दर कोण ठरवतं ; वाचा याबाबत सविस्तर माहिती
यामुळे सोयाबीन बाजार भावात वाढ झाल्यास सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांना दिवाळीमध्ये दिलासा मिळणार आहे नाहीतर यंदाची दिवाळी देखील शेतकऱ्यांसाठी अडचणीची राहणार आहे. दरम्यान या वर्षी सोयाबीन पिकाला पावसाच्या लहरीपणाचा फटका बसत आहे.
एका रिपोर्टनुसार यावर्षी दोन लाख हेक्टरवरील सोयाबीन पीक पावसामुळे बाधित झाले आहे. शिवाय काढणी केलेल्या सोयाबीन पिकाला देखील पावसाच्या लहरीपणाचा फटका बसला असून काढणी केलेल सोयाबीन पावसात सापडले आहे. यामुळे या वर्षी सोयाबिनच्या उत्पादनात घट होणार असल्याचे मत शेतकरी बांधव आणि जाणकार लोक व्यक्त करत आहेत.
हे पण वाचा : आज ‘या’ बाजारात कांद्याला मिळाला 3,500 चा भाव, वाचा आजचे बाजारभाव
एकंदरीत या वर्षी पावसाच्या लहरीपणामुळे सोयाबीनची उत्पादकता कमी होणार आहे शिवाय उत्पादन खर्च वाढला आहे. यामुळे सध्या मिळत असलेल्या बाजार भावात सोयाबीन पिकासाठी झालेला उत्पादन खर्च काढणे मुश्कील आहे. एकंदरीत नवीन सोयाबीन मध्ये ओलावा अधिक असल्याने बाजार भाव कमी मिळत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. शिवाय पावसात सापडलेल्या सोयाबीन 3000 रुपये प्रतिक्विंटल पासून विक्री होत आहे.
यामुळे सोयाबीनच्या बाजार भावात वाढ झाली पाहिजे अशी शेतकरी बांधवांची इच्छा आहे. जाणकार लोकांच्या मते या वर्षी सोयाबीन पाच हजार रुपये प्रति क्विंटलच्या आसपास राहणार आहे. मात्र अजून याबाबत स्पष्टता येण्यासाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांनी टप्प्याटप्प्याने आणि बाजारपेठेचा आढावा घेत सोयाबीनची विक्री करणे त्यांच्यासाठी फायदेशीर राहणार आहे.
हे पण वाचा : ‘या’ मुळे कापसाचा बाजारभाव वाढणार, वाचा काय राहणार कापूस दरवाढीची कारणे