Soybean Bajar Bhav : सोयाबीनच्या दरात (Soybean Rate) या हंगामात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन हमीभावापेक्षा (Soybean Msp) कमी किमतीत विकला जात असल्याचे चित्र आहे. अशा परिस्थितीत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे (Soybean Grower Farmer) कंबरडे मोडले आहे. खरं पाहता केंद्र सरकारच्या एका चुकीच्या धोरणामुळे शेतकरी बांधवांचे (Farmer) वाटोळे होत आहे. मित्रांनो, खाद्यतेलामधील महागाई पाहता केंद्र शासनाने (Central Government) खाद्यतेल आयात विनाशुल्क केली आहे.
यामुळे केंद्र शासनाने सामान्य जनतेला दिलासा देण्याचे काम केले असून आपले निवडणुकीसाठी मैदान तयार केल आहे. मात्र यामुळे देशातील तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत आहे. खाद्यतेल आयातीला मोकळे रान मिळाले असल्यामुळे देशाअंतर्गत तेलबिया पिकाला अतिशय कवडीमोल बाजारभाव (Soybean Market Price) मिळत आहे.
आता चालू हंगामातील तेलबिया पिकांची आवक बाजारात होऊ लागली आहे. मात्र सरकारने खाद्यतेल आयातीला विनाशुल्क परवानगी दिली असल्याने तेलबिया पिकांना बाजारात कवडीमोल बाजार भाव मिळत आहे. सोयाबीन भुईमूग तसेच इतर तेलबिया पिकाला अतिशय नगण्य दर मिळत आहे. त्यामुळे तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये रोष दिवसेंदिवस वाढत आहे. दरम्यान गुजरात मध्ये निवडणुका येत्या काही दिवसात सुरू होणार आहेत.
गुजरात मध्ये भुईमूग लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. तिथेदेखील भुईमुगाचे दर कमालीचे खाली आले आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांचा हा मुद्दा गुजरातमधून भाजपाला सत्ता बाहेर करण्यासाठी पुरेसा असल्याने आता केंद्रातील भाजप सरकार गुजरात मधील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आणि आपल्या निवडणुकीचे स्वार्थ जोपासण्यासाठी खाद्यतेल आयातीवर कर लादण्याची शक्यता आहे. पाम तेलाच्या आयातीवर कर लावण्यासाठी सरकार दरबारी हालचाली वाढल्या असल्याची माहिती जाणकार लोकांकडून दिली जात आहे.
यामुळे भाजप गुजरात मध्ये शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न करणार आहे. दरम्यान, एका मीडिया रिपोर्टनुसार सरकार दरबारी कच्च्या आणि रिफाईन्ड पामतेलाच्या आयातीवर कर पूर्ववत करण्याच्या प्रस्तावावर विचार सुरु आहे. ग्राहक आणि शेतकरी या दोन्हींचे हित जोपासण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे यावेळी सांगितले जात आहे. एकंदरीत काय गुजरात मध्ये आपली सत्ता जाण्याची भीती भाजपाला स्वस्थ बसू देत नसून गुजरात मध्ये आपली सत्ता टिकविण्यासाठी भाजप पुन्हा एकदा खाद्यतेल आयातीवर कर लागू शकते.
यामुळे भाजपाला किती फायदा होतो हे तर येणारा काळच सांगेल मात्र यामुळे शेतकऱ्यांना निश्चितच तात्पुरता का होईना दिलासा मिळणार आहे. एकंदरीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या मतदारांना साधण्यासाठी राजकीय पक्ष काहीही करू शकतात. आता केंद्र सरकारने खाद्यतेल आयातीवर कर लावला तरी देखील हा शेतकरी हिताचा निर्णय राहणार नसून हा निवडणूक हिताचा निर्णय राहणार असल्याची टीका देखील जाणकार लोक करत आहेत.
एकंदरीत येत्या काही दिवसात गुजरात मध्ये इलेक्शन सुरू होणार असल्याने भाजप खाद्यतेल आयातीवर कर लावण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत येत्या काही दिवसात सोयाबीन तसेच भुईमुगाच्या बाजार भावात कमालीची वाढ पाहायला मिळू शकते.