Soybean and Maize Farming : महाराष्ट्रात सोयाबीन आणि मका या दोन्ही पिकांच्या लागवडीखालील क्षेत्र खूपच उल्लेखनीय आहे. मका हे राज्यातील जवळपास 36 जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणारे पीक आहे. खरीप हंगामात याची पेरणी केली जाते. सोयाबीन बाबत बोलायचं झालं तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या तिन्ही विभागांमध्ये याची कमी-अधिक प्रमाणात लागवड केली जाते.
सोयाबीनची सर्वात जास्त लागवड मराठवाडा आणि विदर्भात पाहायला मिळते. दरम्यान महाराष्ट्रासहित संपूर्ण देशभरातील मका आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आज एक मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
आज 29 ऑगस्ट 2024 ला क्रिस्टल क्रॉप प्रोटेक्शन या अग्रगण्य कृषी रसायन उत्पादक कंपनीने बाजारात एक नवीन कीटकनाशक लॉन्च केले आहे. कंपनीकडून हे कीटकनाशक मका आणि सोयाबीन पिकासाठी शिफारशीत करण्यात आले आहे.
या कीटकनाशकाला कंपनीने प्रोक्लेम एक्सटीआरए या नावाने बाजारात उतरवलं आहे. कंपनीच्या म्हणण्यानुसार हे कीटकनाशक विशेषतः मका आणि सोयाबीनसाठी तयार केलेले नवीनतम कीटकनाशक आहे.
हे कीटकनाशक वेगवेगळ्या कीटकांचा आणि अळींचा बंदोबस्त करण्यास सक्षम आहे. फॉल आर्मीवर्म सारख्या कीटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी हे कीटकनाशक प्रभावी ठरणार आहे.
या कीटकनाशकाची फवारणी केली की दीर्घकाळापर्यंत पीक सुरक्षित राहते आणि शेतकऱ्यांना संपूर्ण पीक चक्रात जास्तीत जास्त उत्पादन घेण्यास मदत करते, असा दावा कंपनीने केला आहे.
या सोल्यूशनसह, शेतकरी पीक आरोग्य आणि उत्पादकता वाढवू शकतात. यामुळे शेतकऱ्यांना चांगले दर्जेदार उत्पादन मिळणार आहे.
शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरल्यानंतर 30-60 दिवस आणि 60-90 दिवसांच्या दरम्यान प्रोक्लेम XTRA या कीटकनाशकाची फवारणी करावी असा सल्ला कंपनीने दिला आहे.
मक्यासाठी जर या कीटकनाशकाचा वापर करायचा असेल तर त्यांनी पेरणीनंतर 11-25 दिवसांनी आणि 26-60 दिवसांच्या दरम्यान फवारणी करावी, दोन फवारण्यांमध्ये 15 दिवसांचे अंतर ठेवावे.
विशेष म्हणजे या कीटकनाशकाचा वापर कसा करावा यासाठी कंपनीकडून लवकरच वेगवेगळ्या ठिकाणी शिबिर देखील आयोजित केले जाणार आहेत.