Soyabean Variety : पिवळं सोन अर्थातच सोयाबीन पीक लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आजचा हा लेख खूपच फायदेशीर ठरणार आहे. जर तुम्हीही यंदाच्या खरीप हंगामात सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत वाचायला हवी. कारण की आज आपण सोयाबीनचे कमी कालावधीत तयार होणारे टॉप पाच वाण कोणते आहेत ? याविषयी थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
खरे तर नुकत्याच काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने यावर्षी चांगला पाऊस राहणार असा अंदाज दिला आहे. यंदाच्या मान्सून काळात म्हणजे जून ते सप्टेंबर 2024 या कालावधीत राज्यात सरासरीपेक्षा अधिकच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
निश्चितच, जर हवामान खात्याचा हा अंदाज खरा ठरला तर यंदा सोयाबीन लागवडी खालील क्षेत्र वाढणार आहे. तथापि सोयाबीनच्या पिकातून चांगले दर्जेदार उत्पादन मिळवायचे असेल तर शेतकऱ्यांनी याच्या सुधारित जातीची लागवड करणे त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.
अशा परिस्थितीत आज आपण सोयाबीनच्या कमी कालावधीत तयार होणाऱ्या जातींची माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
रुची सीड्स कंपनीचे एमडीएस 2001 : जर तुम्ही यावर्षी सोयाबीन लागवडीच्या तयारीत असाल तर रुची सीड्स कंपनीचे एमडीएस 2001 हे सुधारित वाण तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. कृषी तज्ञांनी सांगितल्याप्रमाणे सोयाबीनच्या या जातीची राज्यातील अनेक भागांमध्ये लागवड होत आहे. विदर्भ, मराठवाडा या प्रमुख सोयाबीन उत्पादक पट्ट्यात या जातीची लागवड केली जात आहे.
सोयाबीनचा हा वाण 70 ते 75 दिवसात हार्वेस्टिंग साठी तयार होत असल्याचा दावा तज्ञांनी केला आहे. म्हणजेच हा एक अल्प कालावधीत हार्वेस्टिंग साठी तयार होणारा वाण आहे. या जातीपासून एकरी 10 क्विंटलचे ऍव्हरेज उत्पादन मिळू शकते असे म्हटले जात आहे.
जे.एस 9705 : सोयाबीनचा हा देखील एक सुधारित वाण आहे. या जातीची आपल्या महाराष्ट्रात बऱ्यापैकी लागवड पाहायला मिळते. या जातीची सर्वात मोठी विशेषता म्हणजे यातून अवर्षण व जास्त पावसात सुद्धा चांगले उत्पादन मिळवता येणे शक्य आहे. या जातीचे पीक 70 ते 75 दिवसात तयार होते आणि यापासून दहा ते बारा क्विंटल एवरेज उत्पादन मिळते.
दप्तरी सीड्स कंपनीचे चेतक : मराठवाडा आणि विदर्भ विभागातील काही शेतकरी याची लागवड करत आहेत. या जातीबाबत बोलायचं झालं तर या जातीचे पीक 80 ते 85 दिवसात हार्वेस्टिंगसाठी तयार होते. या जातीपासून शेतकऱ्यांना एकरी 10 ते 12 क्विंटलचा उतारा मिळू शकतो असा दावा तज्ञांनी केलेला आहे.
एम ए यु एस 47 : सोयाबीनची ही देखील एक प्रमुख जात आहे. या जातीची राज्यभर लागवड पाहायला मिळते. या जातीचे पीक पेरणीनंतर सरासरी 80 ते 85 दिवसात परिपक्व होत असते. या जातीपासून मिळणाऱ्या उत्पादनाबाबत बोलायचं झालं तर या जातीची पेरणी करून शेतकऱ्यांना एकरी 10 ते 12 क्विंटलचे उत्पादन मिळवता येणे शक्य होणार आहे.
एम ए सी एस 57 : हा देखील एक अल्प कालावधीत काढणीसाठी तयार होणारा सोयाबीनचा प्रमुख वाण आहे. कृषी तज्ञांनी म्हटल्याप्रमाणे या जातीचे पीक 75 ते 90 दिवसात परिपक्व होत असते. याच्या उत्पादनाबाबत बोलायचं झालं तरी यापासून एकरी दहा ते बारा क्विंटलचे उत्पादन मिळू शकते असा दावा तज्ञांनी केलेला आहे.