Soyabean Bajar Bhav : सोयाबीन (Soybean Crop) हे महाराष्ट्र समवेत संपूर्ण देशात उत्पादित केले जाणारे एक मुख्य पीक आहे. आपल्या महाराष्ट्रात सोयाबीन लागवड (Soybean Farming) विशेष उल्लेखनीय आहे. देशातील एकूण सोयाबीन उत्पादनात (Soybean Production) महाराष्ट्राचा मोठा सिंहाचा वाटा आहे.
राज्यातील विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्हे नव्हे-नव्हे तर खानदेशातील काही भागात देखील सोयाबीनचे पीक घेतले जाते. एकंदरीत राज्यातील बहुतांशी शेतकरी बांधवांचे सर्व अर्थकारण सोयाबीन या नगदी पिकावर (Cash Crop) अवलंबून असते. सध्या खरीप हंगामातील (Kharif Season) सोयाबीन पिकाची काढणी सुरू आहे. नवीन सोयाबीन आता बाजारात दाखल झाला आहे. मात्र सध्या सोयाबीन पिकाला अतिशय कवडीमोल दर मिळत आहे.
सध्या सोयाबीन ला हमीभाव प्रमाणेच बाजारभाव मिळत आहे. सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांच्या मते, सध्या मिळत असलेल्या बाजारभावात सोयाबीन पिकासाठी झालेला खर्च काढणे देखील मुश्कील आहे. दरम्यान जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या सोयाबीनला जो कवडीमोल दर मिळत आहे त्यासाठी सरकार जबाबदार आहे. आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की सरकारच्या काही धोरणांमुळे सोयाबीन बाजारात सोयाबीनला अतिशय नगण्य दर मिळत आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया सरकारची अशी कोणती धोरणे आहे त्यामुळे सोयाबीन बाजार दबावात आला आहे.
सध्या सोयाबीनला किती बाजारभाव मिळतोय बर
मित्रांनो जसं की आपणास ठाऊकच आहे की या वर्षी सरकारने सोयाबीनसाठी 4300 रुपये प्रतिक्विंटल असा हमीभाव लावून दिला आहे. मात्र, यावर्षी महाराष्ट्रासमवेतच संपूर्ण सोयाबीन उत्पादक राज्यात सोयाबीन पिकाला जास्तीच्या पावसाचा मोठा फटका बसला आहे. हवामान बदलामुळे सोयाबीन पिकावर येलो मोझॅक व्हायरस पाहायला मिळाला आहे. यामुळे सोयाबीन उत्पादनात काही होणार असल्याचा दावा आहे. शिवाय सोयाबीन पिकासाठी उत्पादन खर्च देखील अधिक झाला आहे.
मात्र सध्या सोयाबीनचा हमीभाव एवढाच बाजार भाव मिळत असल्याने सोयाबीन उत्पादकांना सोयाबीन पिकासाठी आलेला खर्च काढणे मुश्कील असल्याचे जाणकार नमूद करत आहेत. व्यापाऱ्यांच्या मते सध्या बाजारात नवीन सोयाबीन दाखल होत आहे. या नवीन सोयाबीनमध्ये 16 ते 18 टक्के पर्यंत ओलावा आहे.
अशा परिस्थितीत नवीन सोयाबीनला कमी बाजारभाव मिळत आहे. नवीन सोयाबीनला 4200 ते 4 हजार 600 रुपये प्रति क्विंटल यादरम्यान बाजार भाव मिळत आहे. तसेच जुन्या सोयाबीनला पाच हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंतचा बाजार भाव मिळत आहे. तसेच सोयाबीन बाजार दबावात राहण्यामागे सरकारचे निर्णय कारणीभूत असल्याचे सांगितले जात आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीनला मिळतोय कवडीमोल दर
मित्रांनो जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने या 2 वर्षात तब्बल 40 लाख टन सोयाबीन आणि सूर्यफूल तेलाच्या शुल्कमुक्त आयातीला परवानगी दिली आहे. याचाच अर्थ यंदा 20 लाख टन तेलाच्या आयातीवर कोणतच शुल्क नसेल. सरकारच्या या निर्णयामुळे सोयाबीन बाजारावर परिणाम जाणवत आहे. यामुळेच खरिपातील महत्त्वाचं तेलबिया असलेलं सोयाबीन पीक दबावात आलं असून सध्या सोयाबीनला कवडीमोल दर मिळत आहे.
अशा परिस्थितीत जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार केंद्र सरकारने कपात केलेल्या खाद्यतेल आयात शुल्कात वाढ केल्यास सोयाबीन बाजारभावात सुधारणा होणे शक्य आहे. या सोबतच केंद्र सरकारने कच्च पामतेल, सूर्यफूल आणि सोयाबीन तेलावरील आयात शुल्क किमान 30 टक्के केले पाहिजे त्याचबरोबर शुल्कमुक्त आयात बंद करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. असं केल्यास सोयाबीन बाजारात उठाव निर्माण होऊन सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळणार असल्याचे तज्ञ नमूद करत आहेत.