Solar Rooftop Yojana : केंद्र शासनाच्या माध्यमातून सौर ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना कार्यान्वित करण्यात आल्या आहेत. पीएम कुसुम योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदानावर सोलर पंप उपलब्ध करून दिले जात आहेत तर घरगुती वापरासाठी सोलर पॅनल बसवण्यासाठी देखील अनुदान केंद्र शासनाच्या माध्यमातून मिळत आहे.
घरगुती विज ग्राहकांना सौरऊर्जेसाठी प्रोत्साहित करणे हेतू सोलर रूप टॉप योजना राबवली जात आहे. ही योजना केंद्राच्या माध्यमातून राबवली जाते आणि पीएम मोदी यांच्या महत्त्वकांक्षी योजनेपैकी एक असल्याचा दावा केला जातो.
महाराष्ट्रातही ही योजना प्रभावीपणे राबवली जात असून आतापर्यंत राज्यातील अनेक ग्राहकांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. दरम्यान आज आपण या योजनेचे स्वरूप आणि योजनेसाठी अर्ज कसा आणि कुठं करायचा याविषयी जाणून घेणार आहोत.
योजनेचे स्वरुप नेमके काय?
सोलर रुफ टॉप योजनेअंतर्गत सोलर पॅनल घराच्या छतावर बसवण्यासाठी 40 टक्क्यांपर्यंतचे अनुदान उपलब्ध होते. तीन किलो वॅट पर्यंतचे सोलर पॅनल बसवण्यासाठी हे 40 टक्के अनुदान घरगुती वीज ग्राहकांना दिले जाते. दरम्यान आम्ही आपणास सांगू इच्छितो की, दहा किलो वॅट पर्यंत सोलर पॅनल बसवण्यासाठी पहिला तीन किलोमीटर पर्यंत 40% अनुदान आणि मग सात किलो वॅट सोलर पॅनलवर 20% इतक अनुदान दिले जाईल.
दहा किलो वॅट पेक्षा अधिक सोलर पॅनल बसवण्यासाठी अनुदानाचे प्रावधान राहणार नाही. मात्र असे असले तरी गृहनिर्माण संस्था तसेच घरगुती कल्याण संघटनांना पाचशे किलोवॅट पर्यंतच्या सोलर पॅनलसाठी लाभ दिला जाणार आहे परंतु प्रत्येक घरासाठी दहा किलो वॅटच्या सोलर पॅनलची मर्यादा या ठिकाणी राहणार आहे. या योजनेअंतर्गत एकूण खर्चापैकी अनुदानाची रक्कम वगळता उर्वरित रक्कम संबंधित सोलर पॅनल विक्रेत्याला द्यावी लागणार आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी या वेबसाईटवर करा अर्ज
आम्ही आपणास सांगू इच्छितो की या योजनेअंतर्गत अनुदानाचा लाभ घेण्यासाठी कंपनीच्या पोर्टलवर अर्ज करावा लागणार आहे. तसेच अधिकृत वेंडर कडूनच इच्छुक ग्राहकांना सोलर रूफटॉप पॅनल बसवता येणार आहे.
या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी www.mahadiscom/consumerportal/renewable energy portal/solar rooftop या लिंकवर जाऊन इच्छुक व्यक्तींना अर्ज करायचा आहे.