Solar Panel Subsidy News : अलीकडे वाढत्या वीज बिलामुळे सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहेत. म्हणून विजबिल कसे कमी होईल यासाठी सर्वजण विजेचा कमीत कमी वापर करण्याचा प्रयत्न करतात. परंतु उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये घरामध्ये विविध उपकरणांचा वापर वाढतो.
एसी, फ्रिज, कुलर, पंखा, ओव्हन, इलेक्ट्रिक वॉटर हिटर, वॉटर प्युरिफायर अशी एक ना अनेक उपकरणे विजेवर चालतात. साहजिकच ही उपकरणे वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च होते. यामुळे वीज बिलाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे.
मात्र, उपकरण वापरूनही हे वीज बिल शून्यावर आणले जाऊ शकते. यासाठी सोलर पॅनल बसवावे लागणार आहे. विशेष बाब अशी की सोलर पॅनल बसवण्यासाठी शासनाकडून अनुदानही मिळत आहे.
शासनाने नुकतीच पीएम सूर्य घर मोफत वीज योजना नावाची एक नवीन योजना सुरू केलेली आहे.या योजनेअंतर्गत सोलर पॅनल बसवण्यासाठी ग्राहकांना 78 हजार रुपयांपर्यंतचे अनुदान मिळत आहे.
या योजनेअंतर्गत एक किलो वॅट पासून ते दहा किलो वॅट क्षमतेच्या सोलर पॅनलसाठी अनुदान उपलब्ध करून दिले जात आहे. एक किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर 30 हजार रुपये अनुदान मिळते.
दोन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर 60,000 रुपये अनुदान मिळते. तीन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर 78 हजार रुपयाचे अनुदान मिळते. तसेच तीन किलोवॅटपेक्षा अधिक क्षमतेचे सोलर पॅनल बसवले तरीही 78 हजार रुपये एवढेच अनुदान मिळते.
यामुळे जर तुम्ही सोलर पॅनल बसू इच्छिता साल तर तुम्हाला या योजनेचा मोठा फायदा होणार आहे. ही योजना सर्वसामान्यांसाठी फायदेशीर ठरत असल्याने याला मोठ्या प्रमाणात प्रतिसादही मिळत आहे.
पण अनेकांच्या माध्यमातून किती किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल त्यांच्यासाठी फायदेशीर राहिला असा प्रश्न उपस्थित केला होता. दरम्यान आज आपण याच प्रश्नाचे उत्तर जाणून घेणार आहोत.
एक किलोवॅट क्षमतेचे सोलर पॅनल किती वीज तयार करते ?
ज्या कुटुंबाला महिन्याला दीडशे युनिट पर्यंत वीज लागत असेल त्यांना एक किलो वॅटचा सोलर पॅनल फायदेशीर ठरू शकतो. म्हणजे एक किलो वॅटचा सोलर पॅनल 150 युनिट पर्यंतची वीज तयार करू शकतो.
2 अन 3 किलोवॅटचा सोलर पॅनल किती वीज तयार करणार ?
ज्या कुटुंबाला महिन्याकाठी दीडशे ते तीनशे युनिट पर्यंतची वीज लागत असेल त्यांना दोन ते तीन किलो वॅट चे सोलर पॅनल बसवावे लागणार आहेत. परंतु जर एखाद्या कुटुंबाला यापेक्षा जास्तीची वीज लागत असेल तर त्यांना अधिक क्षमतेचे सोलर पॅनल इन्स्टॉल करावे लागणार आहे.