Solar Panel Price : अलीकडे सर्वसामान्य लोक वाढत्या महागाईमुळे पूर्णपणे बेजार झाले आहेत. सर्वसामान्यांना वाढत्या महागाईचा मोठा फटका बसत आहे. अलीकडे वीज दरात देखील मोठी वाढ झाली आहे. यामुळे हजारो रुपयांचे वीज बिल भरून सर्वसामान्य कंटाळले आहेत. दरमहिना हजारो रुपयांचे येणारे वीज बिल सर्वसामान्यांचे अर्थकारण बिघडवत आहे. त्यामुळे आता अनेकजण घराच्या छतावर सोलर पॅनल बसवण्याच्या प्लॅनमध्ये आहेत.
जर तुम्हीही असाच काहीसा प्लान करत असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच खास राहणार आहे. जर तुमच्या घरासाठी महिन्याला 300 युनिट वीज पुरेशी ठरत असेल तर तुम्ही दोन किलोवॅटचे सोलर पॅनल बसवू शकता. दरम्यान आज आपण दोन किलो वॅटचे सोलर पॅनल बसवण्यासाठी सर्वसामान्यांना किती रुपयांचा खर्च करावा लागू शकतो याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
दोन किलो वॅटचे सोलर पॅनल किती वीज तयार करते
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन किलो वॅटचे सोलर पॅनल दिवसाला दहा युनिट एवढी वीज तयार करू शकते. अर्थातच हे सोलर पॅनल जर एखाद्याने बसवले तर त्याला महिन्याकाठी 300 युनिट पर्यंतची वीज मिळणार आहे. एवढी वीज एका सामान्य घरासाठी पुरेशी ठरते.
कोणते सोलर पॅनल ठरणार फायदेशीर ?
खरेतर बाजारात अनेक कंपन्यांचे सोलर पॅनल विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ग्राहक त्यांच्या बजेटनुसार सोलर पॅनल खरेदी करू शकणार आहेत. जर तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही विना बॅटरीचे सोलर पॅनल तुमच्या घराच्या छतावर इंस्टॉल करू शकता.
बाजारात अशा अनेक कंपन्या आहेत जे की विना बॅटरीचे सोलर पॅनल प्रोव्हाइड करत आहेत. जर समजा तुमचा बजेट खूपच कमी असेल आणि तुम्हाला 2 किलो वॅटचे सोलर पॅनल्स कमी पैशात घ्यायचे असेल तर तुम्ही यासाठी पॉली पॅनेल घेऊ शकता.
या प्रकारातील 2 किलोवॅटचे सोलर पॅनल सुमारे 56,000 रुपयांना मिळणार आहे. पण कमी सूर्यप्रकाशात आणि पावसाळ्याच्या दिवसात हे सोलर पॅनल खूप कमी वीज निर्माण करू शकते. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात आणि हिवाळ्यात त्यांची वीज निर्मिती खूपच कमी राहते.
जर तुमचे बजेट चांगले असेल आणि तुम्हाला चांगल्या तंत्रज्ञानाचा सोलर पॅनल घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्ही मोनो पर्क टेक्नॉलॉजीचे सोलर पॅनल खरेदी करू शकता. या प्रकारातील म्हणजेच मोनो पर्क टेक्नॉलॉजीचे दोन किलो वॅटचे पॅनल सुमारे 66 हजार रुपये एवढा खर्च करावा लागू शकतो.
जर तुम्हाला याहीपेक्षा भारी सोलर पॅनल घ्यायचे असेल, याहीपेक्षा अत्याधुनिक तंत्रज्ञानाची सोलर पॅनल्स हवे असतील तर तुम्ही बायफेशियल सोलर पॅनल्स घेऊ शकता जे दोन्ही बाजूंनी काम करतात.
म्हणूनच त्यांची कार्यक्षमता देखील खूप जास्त आहे आणि त्यांची किंमत देखील खूप जास्त आहे. तुम्हाला सुमारे रु.76000 मध्ये 2Kw बायफेशियल सोलर पॅनेल मिळेल, असा अंदाज काही तज्ञांनी दिला आहे.
ऑन ग्रिड सोलर सिस्टीम हे याचे उत्तम उदाहरण आहे, यामध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारची बॅटरी लावण्याची गरज नसते. तुम्हाला फक्त सोलर पॅनल आणि सोलर इन्व्हर्टर बसवावे लागते जेणेकरून तुमचे वीज बिल कमी होईल.