Solar Panel : जर तुम्हीही वाढत्या विज बिलामुळे त्रस्त झाला असाल तर तुमच्यासाठी आजची ही बातमी खूपच कामाची राहणार आहे. कारण की आज आपण सोलर पॅनल विषयी माहिती जाणून घेणार आहोत. वीज बिल शून्यावर यावे यासाठी 5 KW चा सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च येईल ? याविषयी आज आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये सोलर पॅनल इंस्टॉल करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. विशेष म्हणजे शासन देखील रुफ टॉप सोलर पॅनल इन्स्टॉल करण्यासाठी अनुदान देत आहे. शासनाकडून 30 हजार रुपयांपासून 78000 पर्यंतचे अनुदान दिले जात आहे.
यामध्ये एक किलो वॅट सोलर पॅनलसाठी 30 हजार, दोन किलो वॅट सोलर पॅनलसाठी 60,000 आणि तीन किलो वॅट किंवा त्यापेक्षा अधिक आणि दहा किलो वॅट पर्यंतच्या क्षमतेच्या सोलर पॅनल साठी शासनाकडून 78 हजार रुपयांचे अनुदान दिले जात आहे.
म्हणजेच पाच किलो वॅटचे सोलर पॅनल बसवले तर ग्राहकांना 78000 रुपयांपर्यंतचे अनुदान मिळू शकणार आहे. आता आपण पाच किलो वॅट सोलर पॅनल बसवण्यासाठी किती खर्च करावा लागतो हे जाणून घेणार आहोत.
5 Kw सोलर सिस्टम किती वीज निर्माण करते?
जाणकार लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच किलो वॅटचे सोलर सिस्टम एका दिवसात जवळपास 25 युनिट पर्यंतची वीज उत्पादित करण्यास सक्षम राहते.
अर्थातच जें कुटुंब महिन्याकाठी ७५० युनिट पर्यंत वीज वापरते अशा कुटुंबासाठी पाच किलोवॅट क्षमतेचे सोलर सिस्टम पुरेसे ठरणार आहे.
जर तुमचाही वापर यापेक्षा कमी असेल तर तुम्ही कमी क्षमतेचे सोलर पॅनल इंस्टॉल करू शकता. तथापि जर वापर यापेक्षाही अधिक असेल तर तुम्हाला अधिक क्षमतेचे सोलर पॅनल इन्स्टॉल करावे लागणार आहे.
खर्च किती येणार
जर समजा, 5 kW पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनेल असलेले सोलर पॅनल इन्स्टॉल करायचे असेल तर पॉलीक्रिस्टलाइन सोलर पॅनेलसाठी 1,50,000, सोलर इन्व्हर्टरची किंमत- 40,000 रु, अतिरिक्त खर्च – 30,000 असा एकूण दोन लाख वीस हजार रुपयांचा खर्च करावा लागू शकतो.
पण मोनोक्रिस्टलाइन सोलर पॅनल वापरले तर पाच किलो वॅटच्या सोलर पॅनल साठी एक लाख 75 हजार, सोलर इन्वर्टर साठी 40,000, अतिरिक्त खर्च म्हणून 30000 असे एकूण दोन लाख 55 हजार रुपये खर्च करावे लागतील.