Solapur Vande Bharat Express : मुंबई सोलापूर वंदे भारत एक्सप्रेस बाबत एक मोठी माहिती हाती येत आहे. या ट्रेन संदर्भात सोलापूरचे खासदार डॉक्टर जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मोठी मागणी केली आहे. खरं पाहता ही वंदे भारत ट्रेन 10 फेब्रुवारी रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
यामुळे मुंबईहून सोलापूर आणि सोलापूर हुन मुंबई असा प्रवास सोयीचा बनणार आहे. एवढेच नाही तर पुणे मार्गे ही ट्रेन धावणार असल्याने पुणेकरांना देखील याचा फायदा होणार आहे. दरम्यान, आता खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांनी या ट्रेनच्या वेळेत बदल करण्याची मागणी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली आहे.
आम्ही आपल्या माहितीसाठी या ठिकाणी नमूद करू इच्छितो की, 10 फेब्रुवारीपासून सुरू होणारी ही वंदे भारत ट्रेन सोलापूर रेल्वे स्थानकावरून सकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी (6:05AM) निघेल आणि नऊ वाजता (9 AM)पुण्यात पोहोचेल. तसेच दुपारी बारा वाजून 35 मिनिटांनी (12:35 PM) ही ट्रेन मुंबईला (CSMT) पोहोचणार आहे. तसेच मुंबईमधून ही गाडी सायंकाळी चार वाजून दहा मिनिटांनी (4:10PM) ही ट्रेन निघणार असून पुण्याला सात वाजून 10 मिनिटांनी (7:10PM) पोहोचेल आणि पुन्हा सोलापूरला रात्री 10 वाजून 40 मिनिटांनी (10:40PM) पोहोचणार आहे.
मात्र, खासदार सिद्धेश्वर महास्वामी यांनी या ट्रेनच्या सायंकाळच्या वेळेत बदल करण्याची मागणी केली आहे. म्हणजेच मुंबईहून सोलापूर जाताना ट्रेनच्या टाइमिंग मध्ये बदल करावा अशी मागणी केली आहे. 4 वाजता मुंबईहून प्रस्तावित करण्यात आलेली ही ट्रेन सहा वाजता मुंबईहून निघावी अशी त्यांनी मागणी केली आहे. यामुळे सोलापूरहून मुंबईसाठी कामानिमित्त आलेल्या प्रवाशांना याचा फायदा होणार आहे.
सकाळी कामानिमित्त आलेले प्रवासी दिवसभर मुंबई मधले आपले संपूर्ण काम करून घेतील आणि सायंकाळी त्यांना वंदे भारत ट्रेन ने पुन्हा सोलापूर प्रवास करता येईल. त्यामुळे एका दिवसातच सोलापूर वासियांना मुंबईमधील आपले आवश्यक कामे करून पुन्हा सोलापूर गाठने शक्य होणार आहे. विशेष बाब अशी की खासदार महोदय यांनी उपस्थित केलेल्या या मागणीला केंद्रीय रेल्वेमंत्री यांनी सकारात्मकता दाखवली आहे.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत सकारात्मक असा विचार केला जाईल असे आश्वासित केले आहे. निश्चितच खासदार महोदय यांची ही मागणी जर मान्य झाली तर सोलापूर वासियांना याचा फायदा होणार असल्याचे काही जाणकार नमूद करत आहेत.